साकुरच्या कन्येची सुवर्णझेप ! : डॉ. सोनाली मेटांगे ( सहाणे )  बालरोग तज्ञ पदव्युत्तर पदवीत सुवर्णपदकाच्या मानकरी

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बातमी असून इगतपुरी तालुक्यातील साकुरच्या कन्या डॉ. सोनाली हरिष मेटांगे ( सहाणे ) यांनी बालरोग तज्ञ (Pediatrics) पदव्युत्तर पदवी परीक्षेत सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांना हा बहुमान प्रसिद्ध उद्योजिका डॉ. प्रिती अदानी आणि आरती सरीन यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. डॉ. सोनाली मेटांगे यांनी अथक परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर हे उत्तुंग यश संपादन केले आहे. बालरोग तज्ञ म्हणून त्यांनी आपल्या ज्ञानात आणि कौशल्यात सातत्य राखले, ज्याचे फलित त्यांना या सुवर्णपदकाच्या रुपात मिळाले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे कुटुंबीय, साकुर गाव आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्याला त्यांचा अभिमान वाटत आहे. डॉ. प्रिती अदानी आणि आरती सरीन यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते सुवर्णपदक स्वीकारणे हा डॉ. सोनाली यांच्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. या सोहळ्यात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसून येत होते. सुवर्णपदकाला गवसणी घातल्याबद्दल डॉ. सोनालीचे वडील बाळासाहेब कुंडलिक सहाणे यांनी आनंद व्यक्त केला. डॉ. सोनाली मेटांगे यांच्या या यशाने वैद्यकीय क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, यात शंका नाही. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे इगतपुरी तालुक्याच्या सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

error: Content is protected !!