इगतपुरीनामा न्यूज, दि. 9 अवैध गावठी दारूमुळे आदिवासी समाज संपुष्टात येत आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते, भरवज, निरपण ह्या तीन गावातील युवकांनी पुढाकार घेऊन दारू वंद करण्यासाठी आज काम सुरु केले. ह्या युवकांनी संबंधित दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींपर्यंत जाऊन त्यांचे समुपदेशन करून दारूबंदी करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली. त्यानुसार दिवसभरात किमान 200 लिटर गावठी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ मुंबई आग्रा महामार्गावरील घोटीपासून खंबाळे पर्यंत सध्या उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. ह्या उड्डाणपुलाचे काम संथगतीने आणि सोयीप्रमाणे सुरु असल्याने काही व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. असे असूनही संबंधित ठेकेदार काम अतिशय कासवगतीने करीत असल्याचा फटका वाहनधारक सहन करीत आहेत. मात्र आता ह्याची हद्द झाली असून ह्या मार्गावर खड्ड्यांचे प्रमाण अपघातांना कारणीभूत […]
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ आदिवासी गोरगरीब मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन महत्वपूर्ण प्रयत्न करते. मुलांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याचीही दखल घेत असले तरी आदिवासी भागात मात्र जीव धोक्यात घालून विधार्थी शिक्षणाचे धडे गिरवत असल्याचे चित्र दिसत आहे. नाशिक मुंबई महामार्गावरील आदिवासी असणाऱ्या रायगडनगर येथील लोकसंख्या २ हजाराच्या आसपास आहे. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ उद्या शुक्रवार दि. २० रोजी विविध मागण्यासाठी भाजप युवा जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाकडून इगतपुरी नगरपरिषदेवर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. इगतपुरी नगरपरिषदेने मागील महिन्यात इगतपुरीतील नागरिकांची कोणतीही बैठक आणि नागरिकांना विश्वासात न घेता वृत्तपत्रात नोटीस देऊन पाणीपट्टीत वाढ केली आहे. अद्याप नवीन पाणी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ इगतपुरी तालुक्यातील धानोशी या आदिवासी वस्तीवर ऐन उन्हाळ्यात नेहमीच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. विंधनविहिर, कूपनलिका, बोअरवेल विहिरी या दिवसांत कोरड्याठाक पडतात. माजी सरपंच मधुकर बांबळे यांच्या मालकीच्या विहिरीवरून डोक्यावर लांब अंतरावरून पिण्यासाठी पाणी वाहून आणताना महिलांची मोठी कसरत होत असे. बोअरवेलवर आधारित योजनाही पाण्याअभावी अपयशी ठरल्याने समस्या निर्माण झाली होती. ही समस्या […]
समाधान कडवे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ इगतपुरी तालुक्यातील वैतरणा वीज निर्मिती केंद्रातील तसेच तालुक्यातील महावितरणचे वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २८ आणि २९ असे दोन दिवस लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपामध्ये महावितरण चे विविध पदांवरील उच्चपदस्थ अधिकारी, अभियंता अशा २७ संघटना तसेच १२ कंत्राटी संघटना सहभागी झाले […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ आदिवासी आणि दलित वस्तीतील काही कुटुंब नाईलाजाने इगतपुरी शहरातील तळेगाव येथे सार्वजनिक शौचालयाच्या पाण्याच्या टाकीतून पिण्यासाठी पाणी भरत आहेत. गावाजवळ धरण असतांना शौचालयातून पाणी भरणे हा प्रकार अतिशय लाजिरवाणा आहे. अनेक दिवसांपासून हे सुरू असून राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण यांच्या सतर्कतेने ही घटना उघडकीस आली आहे. यानंतर श्री. पठाण यांनी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ चांगले आणि अपघातमुक्त रस्ते म्हणजे आजच्या काळात नागरिकांचा आत्मा आहे. दळणवळणाची व्यवस्था चांगली असेल तर विकासाच्या कार्याला चांगलाच हातभार लागतो. असे असले तरी अनेक रस्त्यांच्या व्यवस्थेकडे सर्रासपणे शासनाचे अधिकारी दुर्लक्ष करतात. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढून नागरिकांचा हकनाक बळी जात असतो. यामुळे अनेक सामाजिक प्रश्नांना नागरिक सामोरे जातात. अशा बिकट काळात संवेदनशील […]
आता माघार नाही ; कंपनीचे गेट बंद करण्याचे तहसीलदारांना निवेदन इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ मुंढेगाव येथील अनेक वर्षांपासून बस्तान मांडून बसलेल्या जिंदाल कंपनीने स्थानिक बेरोजगार युवकांवर नेहमीच अन्याय केलेला आहे. वेळोवेळी स्थानिक नागरिकांनी केलेल्या आंदोलनांना कंपनीने कायमच केराची टोपली दाखवली आहे. जिंदाल कंपनी प्रशासनाने कंपनीतील एकूण कामगारांपैकी ८० टक्के स्थानिक बेरोजगार युवकांना कामावर घ्यावे. स्थानिकांवरचा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ घोटी बुद्रुक येथील हॉटेल साई दरबार पासून रेल्वे गेट रामराव नगर येथील घोटी ते जुना कोल्हार रोडचे डांबरीकरण होणे आवश्यक आहे. ह्या रस्त्याच्या कामाबाबत तातडीने निर्णय होण्याबाबत महात्मा फुले समता परिषदेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष शिवा काळे यांनी निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. उपअभियंता कौस्तुभ पवार आणि गोडसे रावसाहेब यांनी शिवा […]