इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
उद्या शुक्रवार दि. २० रोजी विविध मागण्यासाठी भाजप युवा जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाकडून इगतपुरी नगरपरिषदेवर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. इगतपुरी नगरपरिषदेने मागील महिन्यात इगतपुरीतील नागरिकांची कोणतीही बैठक आणि नागरिकांना विश्वासात न घेता वृत्तपत्रात नोटीस देऊन पाणीपट्टीत वाढ केली आहे. अद्याप नवीन पाणी पुरवठा योजना सुरु झालेली नसुन भावली धरणाचे पाणी नागरिकांना मिळत नाही. मग वाढीव पाणीपट्टी कशासाठी घेतली जात आहे ? पाणी पुरवठा करण्यासाठी इगतपुरीतील सर्व रस्ते खोदुन टाकले आहे, ते खड्डे कधी बुजवणार ? पटेल चौक, आठचाळ, मच्छी मार्केट परिसरातील सर्व नाले घाण कचऱ्याने तुडुंब भरले असुन याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पाणी पुरवठ्याचे पाईप टाकण्यासाठी शहरातील सर्व रस्ते खोदल्यामुळे सर्व रस्त्यांवर पसरली आहे. पुढे पावसाळा सुरु होत असुन पावसाळ्यात शहरातील सर्व रस्ते चिखलमय होतील. त्यामुळे या पाण्यात डास, पिसवा या सारख्या जिवाणुंचा प्रादर्भाव होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे सध्या इगतपुरीकरांना वेळेवर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वेळेवर होत नसुन तासनतास पाण्याची वाट पहावी लागत आहे. या सर्व मागण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजप युवा जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर यांनी दिली आहे.