समाधान कडवे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ इगतपुरी तालुक्यातील वैतरणा वीज निर्मिती केंद्रातील तसेच तालुक्यातील महावितरणचे वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २८ आणि २९ असे दोन दिवस लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपामध्ये महावितरण चे विविध पदांवरील उच्चपदस्थ अधिकारी, अभियंता अशा २७ संघटना तसेच १२ कंत्राटी संघटना सहभागी झाले […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ आदिवासी आणि दलित वस्तीतील काही कुटुंब नाईलाजाने इगतपुरी शहरातील तळेगाव येथे सार्वजनिक शौचालयाच्या पाण्याच्या टाकीतून पिण्यासाठी पाणी भरत आहेत. गावाजवळ धरण असतांना शौचालयातून पाणी भरणे हा प्रकार अतिशय लाजिरवाणा आहे. अनेक दिवसांपासून हे सुरू असून राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण यांच्या सतर्कतेने ही घटना उघडकीस आली आहे. यानंतर श्री. पठाण यांनी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ चांगले आणि अपघातमुक्त रस्ते म्हणजे आजच्या काळात नागरिकांचा आत्मा आहे. दळणवळणाची व्यवस्था चांगली असेल तर विकासाच्या कार्याला चांगलाच हातभार लागतो. असे असले तरी अनेक रस्त्यांच्या व्यवस्थेकडे सर्रासपणे शासनाचे अधिकारी दुर्लक्ष करतात. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढून नागरिकांचा हकनाक बळी जात असतो. यामुळे अनेक सामाजिक प्रश्नांना नागरिक सामोरे जातात. अशा बिकट काळात संवेदनशील […]
आता माघार नाही ; कंपनीचे गेट बंद करण्याचे तहसीलदारांना निवेदन इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ मुंढेगाव येथील अनेक वर्षांपासून बस्तान मांडून बसलेल्या जिंदाल कंपनीने स्थानिक बेरोजगार युवकांवर नेहमीच अन्याय केलेला आहे. वेळोवेळी स्थानिक नागरिकांनी केलेल्या आंदोलनांना कंपनीने कायमच केराची टोपली दाखवली आहे. जिंदाल कंपनी प्रशासनाने कंपनीतील एकूण कामगारांपैकी ८० टक्के स्थानिक बेरोजगार युवकांना कामावर घ्यावे. स्थानिकांवरचा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ घोटी बुद्रुक येथील हॉटेल साई दरबार पासून रेल्वे गेट रामराव नगर येथील घोटी ते जुना कोल्हार रोडचे डांबरीकरण होणे आवश्यक आहे. ह्या रस्त्याच्या कामाबाबत तातडीने निर्णय होण्याबाबत महात्मा फुले समता परिषदेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष शिवा काळे यांनी निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. उपअभियंता कौस्तुभ पवार आणि गोडसे रावसाहेब यांनी शिवा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १० इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील सोपान चिमाजी घोरपडे यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेसाठी त्यांनी भाडोत्री दिलेले घर क्र. 23 चे थकीत भाडे आणि फरक मिळावा यासाठी ते उपोषणाला बसले आहेत. ऑक्टोंबर 2018 पासून दरमहा रुपये 10 हजार 300 रुपये वाढीव भाडे रक्कम फरकासह मिळण्यासाठी बँक […]
इगतपुरीनामा न्यूज (प्रभाकर आवारी, मुकणे) दि. १२ : इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यातील प्रवाशांना व कामगारांना राष्ट्रीय महामार्ग व गोंदे औद्योगिक वसाहत जवळ असल्याने सोयीचे व अधिक वर्दळ असणाऱ्या पाडळी रेल्वेस्थानकाची सुधारणा करून तिकीटगृह व प्रवासी प्रतिक्षागृहाची सुविधा उपलब्ध व्हावी तसेच इतर काही जलद गाड्यांनाही येथे थांबा मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे रेल्वेमंत्री नामदार रावसाहेब दानवे यांच्याकडे पाडळी […]
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १० नाशिक मुंबई महामार्गावरील पाडळी फाटा येथील भुयारी मार्गाची दुरुस्ती करून तो जाण्यायेण्यासाठी सुरळीत करून खुला करावा. आदी मागण्यांसाठी पाडळी देशमुखचे उपसरपंच बाळासाहेब आमले यांनी शालेय विद्यार्थी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यासमवेत आज उपोषण सुरू केले होते. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या यशस्वी मध्यस्थीने व संबंधित राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ इगतपुरी पंचायत समितीच्या स्वच्छ भारत कक्षातील कर्मचारी राहुल नाईक व श्रीमती बगाड हे लाभार्थ्यांच्या शौचालय अनुदानाची प्रकरणे हेतुपुरस्सर प्रलंबित ठेवतात. अनेकदा गहाळ सुद्धा करतात अशी अनेक लाभार्थ्यांची तक्रार आहे. गेल्या आठ नऊ महिन्यांपासून अडसरे बुद्रुक येथील लाभार्थी अनुदानाच्या चौकशीसाठी वारंवार चकरा मारत आहेत. या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता हे अरेरावी व […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ घोटी बस स्थानकातील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. तालुक्यातील अत्यंत वाईट असणारे शौचालय आणि स्वच्छतागृह घोटीच्या बसस्थानकात आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील प्रवास करणाऱ्या महिला व प्रवाशांना मोठा त्रास सोसावा लागतो. हे लक्षात घेऊन शौचालयाची तातडीने दुरुस्ती व नूतनीकरण करावे या मागणीसाठी आगार प्रमुख यांना भाजप युवा मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात […]