
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील साकुर गणातील प्रत्येक गावात मोठा जनसंपर्क म्हणजे अजिबात सोपं नाही. यासह या भागातील लोकांच्या समस्या आणि प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी सूक्ष्म नियोजनाची आखणी करून यासाठी धडपडणारे युवा नेतृत्व म्हणजे राहुल उत्तमराव सहाणे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ( अजित पवार गट ) इगतपुरी तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. युवकांची मोठी सक्रिय फळी त्यांनी निर्माण केली आहे. सामाजिक बांधिलकीतुन नियमितपणे समाजाची सेवा ते करतात. दरवर्षी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आणि गोरगरिबांना अन्नदान करण्याचा त्यांचा संकल्प असतो. विधानसभा निवडणुकीत आमदार हिरामण खोसकर यांच्यासाठी त्यांनी चांगले काम केलेले आहे. साकुर गणातील गावागावात विकासाचे दमदार पर्व आणण्यासाठी त्यांना साकुर गणातून उमेदवारी द्यावी. त्यांना अभूतपूर्व मतांनी निवडून आणण्यासाठी ह्या भागातील कार्यकर्ते जीवाचे रान करतील. राहुल सहाणे यांनाच उमेदवारी द्यावी अशी जनतेची आग्रही मागणी आहे. आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते आणि लोकांनी पक्षाकडे जोरदार मागणी केली आहे.
राहुल सहाणे यांचे वडील समाजभूषण पुरस्कारप्राप्त उत्तमराव अमृता सहाणे यांनी संघर्षातून राजकीय, कृषी, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करीत त्यांना न्याय मिळवून दिला आहे. चुलते स्व. बाबुराव सहाणे यांनी नासाकाचे व्हाईस चेअरमन म्हणून प्रेरणादायी काम केलेले आहे. त्यांच्यासह सहाणे कुटुंबाचा सेवेचा वारसा आणि संस्काराची समृद्धी राहुल सहाणे यांना लाभली. ते डिझाइन इंजिनियर असून तो अमृतराज ट्रेडर्सद्वारे शेतकऱ्यांसाठी विविध कामे करत आहेत. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा युवक अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत आहे. गरिबांना आरोग्यसेवा आणि रुग्णांची सेवा करण्यात ते नेहमी पुढे असतात. उच्चशिक्षित, तडफदार आणि दमदार युवा नेतृत्व म्हणून राहुल सहाणे यांना इगतपुरी तालुक्यात नावाजले जाते. ह्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने साकुर गणातून राहुल सहाणे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची संधी देणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या माध्यमातून साकुर गणातून पक्षाचा पंचायत समिती सदस्य लाभणार आहे. ह्या भागातील जनतेने राहुल सहाणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने पक्षाने याचा प्राधान्याने विचार करण्याची लोकांची मागणी आहे.