राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते पांडुरंग खातळे यांना कावनई गणातून उमेदवारी देण्याची मागणी : श्री. खातळे यांना निवडून आणण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार 

इगतपुरीनामा न्यूज – गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यात समाजाची सेवा करणारे अग्रगण्य व्यक्तिमत्व म्हणून पांडुरंग रामचंद्र खातळे यांना ओळखले जाते. कऱ्होळे गावातील सरपंचपदावर असतांना अभूतपूर्व विकासाची कामे काय असतात हे त्यांनी दाखवून दिले. म्हणूनच ह्या गावातून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत एकतर्फी सत्ता दिली जाते. आमदार हिरामण खोसकर, मविप्र संचालक ॲड. संदीप गुळवे आणि राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांच्यावर अगाध श्रद्धा ठेवणारे पांडुरंग खातळे यांनी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. यासह सध्या ते इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणून पद भुषवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने त्यांना इगतपुरी पंचायत समितीच्या कावनई गणातून उमेदवारी दिल्यास त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ह्या पार्श्वभूमीवर कावनई गणातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी पांडुरंग खातळे यांना उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी केली आहे. गेल्या निवडणूक काळात पांडुरंग खातळे हे तन मन धनाने प्रचार करत असतांना झालेल्या अपघातात त्यांचा एक पाय गमावला गेला. पक्षाने त्यांच्या निष्ठेच्या कार्याची पावती म्हणून त्यांनाच कावनई गणातून प्रतिनिधीत्व करायची संधी द्यावी असेही कार्यकर्त्यांनी सांगितले. कावनई गण बहुतांश काळाने ओबीसीसाठी आरक्षित झाला असल्याने पक्षाने निष्ठावान कार्यकर्त्याच्या पदरात उमेदवारी बहाल करावी. पांडुरंग खातळे यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहून त्यांना निवडून आणण्यासाठी गणातील कार्यकर्ते जीवाचे रान केल्याशिवाय राहणार नाहीत असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

error: Content is protected !!