इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुवर्णा शरद पागेरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीची प्रक्रिया लोकनियुक्त सरपंच अनिता देविदास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ग्रामविकास अधिकारी जितेंद्र चाचरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. नांदगाव बुद्रुक सोसायटीचे संचालक ज्ञानेश्वर पागेरे यांच्या सुनबाई तसेच श्री कृष्ण बिल्डिंग मटेरियल सप्लाय साकुरफाटाचे संचालक शरद पागेरे […]
इगतपुरीनामा न्यूज – सध्या शालेय, विद्यालयीन तरुण-तरुणी यांचा मोबाईलचा वाढलेला वापर अत्यंत घातक आहे. याचे विपरीत परिणाम दिसून येत आहे. पोलीस ठाण्यात रोज येणाऱ्या तक्रारी पाहता युवा पिढीने सोशल मीडियाच्या नादात भरकटून न जाता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. सशक्त पिढी निर्माण करण्यासाठी शालेय जीवनाचा फायदा घ्यावा असे आवाहन इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी केले. […]
इगतपुरीनामा न्यूज – मातृसेवा फाउंडेशन ठाणे, सनेज आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’ ही स्पर्धा घेण्यात आली. ‘शिक्षक ध्येय’चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक, पालक आणि विद्यार्थी वाचक वर्ग आहे. राज्यातील महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नाविन्यपूर्ण […]
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघ आयोजित जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्काराने निनावी जि. प. शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सुशीला चोथवे यांना पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरवण्यात आले. शिरवाडे वणी येथे जागतिक मराठी दिन गौरव, दिन कविवर्य कुसुमाग्रज जीवन गौरव सन्मान सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम पाटील होते. […]
इगतपुरीनामा न्यूज – आयडियल तायक्वांदो अकॅडमी इगतपुरीचे काम अतिशय प्रेरणादायी असून यांच्यामार्फत उत्कृष्ठ खेळाडू उदयाला येत आहेत. ह्या सर्वांच्या सामूहिक शक्तीने इगतपुरी तालुक्यातील खेळाडू आपल्या कौशल्यातून भरीव यश मिळवतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा तायक्वांदो अँड फिटनेस असोसिएशन ऑफ इगतपुरी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर दादा […]
इगतपुरीनामा न्यूज – खैरगावचे भूमिपुत्र माजी सैनिक किसन हंबीर यांना किड्स किंग्डम एज्युकेशन सोसायटी व ज्ञानदर्पण साप्ताहिक यांच्या संयुक्त विद्यमाने “ज्ञानदर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला. निवृत्त पोलीस अधिकारी संजय अपरांती, भारत हबीब सय्यद यांच्या हस्ते त्यांना सन्मानपूर्वक पुरस्कार देण्यात आला. माजी सैनिक किसन हंबीर यांनी सैन्यदलात जम्मू काश्मीर, सिक्किम, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, […]
इगतपुरीनामा न्यूज – गोंदे दुमाला येथील भाऊसाहेब सखाराम खातळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार )पक्षाच्या इगतपुरी तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहचवण्यासाठी कामाला लागा असे […]
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्याचे मानद अध्यक्ष कैलास वाकचौरे यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने संपूर्ण ११ जागांवर दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत अध्यक्षपदी प्रमोद सिताराम ठाकरे हे विजयी झाले. तर उपाध्यक्ष म्हणून देवेंद्र कृष्णाजी हिरे यांची निवड करण्यात आली. सरचिटणीस पदी संजय गिरी, महिला उपाध्यक्षपदी कांचन गुलाबराव आनट, कार्याध्यक्षपदी अशोक भिवराज […]
इगतपुरीनामा न्यूज – उत्तम शेतीमुळे समाजापुढे आदर्श उभा करणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषी व संलग्न क्षेत्रात उत्कृष्ठ कामासाठी आत्मा अंतर्गत विविध पुरस्कार प्रदान करतांना आनंद होत आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामाची ओळख होवून प्रेरणा निर्माण होईल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री ना. दादा भुसे यांनी केले. जिल्हा प्रशासन, जि. […]
इगतपुरीनामा न्यूज – शेतीतील नाविन्याचा शोध घेत अनेक शेतकऱ्यांना तळमळीचे पत्रकार लक्ष्मण सोनवणे आधारस्तंभ ठरले. त्यांच्या विविध आदर्श कामांमुळे त्यांना शासनाचा ‘आदर्श कृषी विस्तारक’ पुरस्कार घोषित झाला आहे. १० ते १४ फेब्रुवारीला नाशिकला होणाऱ्या कृषी महोत्सवात पत्रकार लक्ष्मण सोनवणे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे प्रकल्प संचालक […]