नाशिकला कृषी व नवतेजस्विनी महोत्सवाचे उदघाटन : शेतकऱ्यांना विविध पुरस्कार प्रदान करतांना आनंद -पालकमंत्री ना. दादा भुसे

इगतपुरीनामा न्यूज – उत्तम शेतीमुळे समाजापुढे आदर्श उभा करणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषी व संलग्न क्षेत्रात उत्कृष्ठ कामासाठी आत्मा अंतर्गत विविध पुरस्कार प्रदान करतांना आनंद होत आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामाची ओळख होवून प्रेरणा निर्माण होईल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री ना. दादा भुसे यांनी केले. जिल्हा प्रशासन, जि. प. कृषी विभाग, आत्मा आणि माविम तर्फे नाशिक कृषी व नव तेजस्विनी २०२४ महा महोत्सव १४ फेब्रुवारी पर्यंत होतो आहे. ह्या महोत्सवाचे उदघाटन ना. दादा भुसे यांनी केले. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, महिला व बाल विकास उपायुक्त चंद्रशेखर पगारे, जि. प. कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ, जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड, इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी पीएम सन्मान निधीद्वारे केंद्र व राज्य शासन मिळून १२ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. १ रुपयात पीक विमा देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले. इगतपुरीला १० कोटीचे कृषी भवन मंजूर झाल्याने  चांगले परिणाम दिसून येतील अशी आशा श्री. भुसे यांनी व्यक्त केली. पाऊस कमी असल्याने यंदा पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. पाण्याच्या नियोजन करतांना प्रत्येकाला पुरेसे पाणी मिळण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले जाईल. यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते इगतपुरी तालुक्यातील. कचरू गबाजी शिंदे, पत्रकार लक्ष्मण सोनवणे आदी प्रगतशील शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Similar Posts

error: Content is protected !!