राष्ट्रवादीच्या इगतपुरी तालुका कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब खातळे यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज – गोंदे दुमाला येथील भाऊसाहेब सखाराम खातळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार )पक्षाच्या इगतपुरी तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहचवण्यासाठी कामाला लागा असे आवाहन यावेळी कोंडाजी मामा आव्हाड यांनी केले. जिल्हा उपाध्यक्ष रतन चावला, जेष्ठ नेते कारभारी नाठे, संघटक सोमनाथ भिसे संघटक, युवा जिल्हाध्यक्ष तुषार जाधव, ओबीसी सेलचे सुयश आव्हाड, तालुकाध्यक्ष काशिनाथ कोरडे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!