इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुवर्णा शरद पागेरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीची प्रक्रिया लोकनियुक्त सरपंच अनिता देविदास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ग्रामविकास अधिकारी जितेंद्र चाचरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. नांदगाव बुद्रुक सोसायटीचे संचालक ज्ञानेश्वर पागेरे यांच्या सुनबाई तसेच श्री कृष्ण बिल्डिंग मटेरियल सप्लाय साकुरफाटाचे संचालक शरद पागेरे यांच्या पत्नी सुवर्णा पागेरे यांची बिनविरोध झाल्याबद्दल शेतकरी कृती समितीचे संस्थापकीय अध्यक्ष दशरथ पागेरे, तानाजी गायकर, वि. का. सो. संचालक तथा माजी सरपंच भाऊसाहेब गायकर, माजी सरपंच तुकाराम गायकर, नारायण गायकर, सामाजिक कार्यकर्ते देविदास मोरे, विकास मुसळे, तानाजी पागेरे, भास्कर पागेरे, किरण पागेरे, ग्रामपंचायत सदस्य राजाराम गायकर, अशोक गायकर, मनीषा गायकर, लता शिरसाठ, अरुण शिरसाठ, मंगल कोकाटे, दत्तू पावडे, जनाबाई गायकर, योगेश पाळदे, सुनील पागेरे, तुषार शिरसाठ, शरद पागेरे, योगेश मोरे, गणेश नाडेकर, ज्ञानेश्वर गायकर, किशोर पागेरे, भगवान पागेरे, रमेश पागेरे, लिपिक नामदेव गायकर, गोकुळ गायकर, भरत गायकर, निवृत्ती गायकर आदींनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group