
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघ आयोजित जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्काराने निनावी जि. प. शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सुशीला चोथवे यांना पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरवण्यात आले. शिरवाडे वणी येथे जागतिक मराठी दिन गौरव, दिन कविवर्य कुसुमाग्रज जीवन गौरव सन्मान सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम पाटील होते. अध्यक्ष सुरेश सलादे, उपाध्यक्ष शिवाजी पवार, सचिव सतीश सोनवणे, संयोजक नाथकृपा इव्हेन्ट ग्रुप, मानसिंग ढोमसे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सुशीला चोथवे अनेक उपक्रम राबवितात. शैक्षणिक क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकीत नवनव्या अमृतधारा विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे कामही केले जाते. लहान वयातील मुलांना विविध उपक्रम, प्रयोगातून बौद्धिक व शारीरिक जडणघडण होण्यासाठी विद्यार्थी सक्षमीकरणाचा अजेंडा घेऊन त्या अखंड कार्यरत आहेत. उपक्रमशील शिक्षिका सुशीला चोथवे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल इगतपुरीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, शालेय व्यवस्थापन समिती आणि तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी अभिनंदन केले आहे.