नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे दणदणीत यश : अध्यक्षपदी प्रमोद ठाकरे तर उपाध्यक्षपदी देवेंद्र हिरे यांचा विजय

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्याचे मानद अध्यक्ष कैलास वाकचौरे यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने संपूर्ण ११ जागांवर दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत अध्यक्षपदी प्रमोद सिताराम ठाकरे हे विजयी झाले. तर उपाध्यक्ष म्हणून देवेंद्र कृष्णाजी हिरे यांची निवड करण्यात आली. सरचिटणीस पदी संजय गिरी, महिला उपाध्यक्षपदी कांचन गुलाबराव आनट, कार्याध्यक्षपदी अशोक भिवराज आडसरे, कोषाध्यक्षपदी सुनील शांताराम निकम, कायदेशीर सल्लागारपदी किरण चंद्रमौळी, संघटकपदी सुनील मधुकर शिंदे, सहसचिवपदी बाळू रामदास खंबाईत हे विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मच्छिंद्र कांगणे यांनी तर सहाय्यक म्हणून सुनील शिरसाठ यांनी कामकाज पाहिले. मावळते सरचिटणीस रवींद्र शेलार, राज्याचे मानद अध्यक्ष कैलास वाकचौरे, नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद ठाकरे, राज्य सहनिरीक्षक प्रदीप सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद ठाकरे व उपाध्यक्ष म्हणून देवेंद्र कृष्णाजी हिरे यांची निवड झाल्याने जिल्हाभरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Similar Posts

error: Content is protected !!