भरवीर ग्रामस्थांच्या एकीकरणातून सोसायटीची निवडणुक बिनविरोध : अरुण घोरपडे, खंडेराव शिवराम झनकर आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आनंद

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ इगतपुरी तालुक्यातील पुर्व भागात अत्यंत नावाजलेल्या आणि संपूर्ण इगतपुरी तालुक्याचे लक्ष लागलेल्या भरवीर बुद्रुक विविध सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध झाली आहे. ह्या सोसायटीमध्ये भरवीर बुद्रुक, भरवीर खुर्द आणि भंडारदरावाडीचा समावेश आहे. सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची केली असूनही निवडणुक बिनविरोध झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. सर्व […]

बेलगाव कुऱ्हेच्या उपसरपंचपदी दिलीप भिका गुळवे बिनविरोध : काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली बिनविरोध निवडणुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दिलीप भिका गुळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडणुक झाली. अध्यासी अधिकारी म्हणून लोकनियुक्त सरपंच शुभांगी नंदराज गुळवे यांनी कामकाज पाहिले. पदाच्या माध्यमातून बेलगाव कुऱ्हे येथील गावकऱ्यांसाठी जीव ओतून काम करणार असल्याचे नवनियुक्त उपसरपंच दिलीप गुळवे यांनी […]

जिल्हा परिषद पंचायत समिती गट आणि गणांची प्रारूप यादी डाऊनलोड करा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकासाठी जिल्हाधिकारी नाशिक यांनी तयार केलेली प्रारूप यादी खालीलप्रमाणे डाऊनलोड करता येईल. इगतपुरी तालुक्यात काही गट आणि काही गणांची नावे बदलली असली तरी गावे मात्र तीच आहेत.

गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कुशेगाव आदिवासी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यापूर्वी ९ संचालक बिनविरोध निवडून आले होते. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या १ जागेसाठी २ अर्ज दाखल झाल्याने निवडणुक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ह्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार गौतम सोनवणे यांची समजूत घालून […]

रायांबे सोसायटी निवडणुकीत सहकार विकास पॅनेलचे यश : नवनिर्वाचित संचालकांचा पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ रायांबे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सहकार विकास पॅनलने चांगले यश संपादित केले आहे. कर्जदार गटामधून रमेश एकनाथ धांडे, भगवान कचरु धांडे, यशवंत रामकृष्ण धांडे, ऋषिकेश अंबादास धांडे, बाळासाहेब मुरलीधर भोर, विष्णु पांडुरंग धांडे, रावजी बाबुराव धांडे, ज्ञानेश्वर विठोबा धांडे, महिला राखीव गटातून कमलाबाई चिंधु भोर, सुमनबाई रघुनाथ धांडे, आदिवासी […]

घोटी सोसायटीच्या चेअरमनपदी नामदेव शिंदे, व्हॉइस चेअरमनपदी रोहिदास जाधव बिनविरोध : उदय जाधव, संदीप गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ इगतपुरी तालुक्यातील आर्थिक बाजारपेठ तथा राजकीय केंद्र असलेल्या घोटी सोसायटीच्या चेअरमनपदी नामदेव शिंदे व्हॉइस चेअरमनपदी रोहीदास जाधव यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणूकीकडे तालुक्याचे लक्ष लागून होते. घोटी सोसायटीच्या १३ जागापैकी शेतकरी विकास पॅनलच्या १२ जागा बहुमताने निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, काँग्रेस नेते ॲड. संदीप […]

गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली मोडाळे सोसायटीच्या चेअरमनपदी कचरू गोऱ्हे ; व्हॉइस चेअरमनपदी नंदू बोडके अविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पावधीत प्रकाशझोतात आलेल्या मोडाळे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदावर कचरू गोऱ्हे यांना बिनविरोध स्थान मिळाले आहे. त्याचप्रमाणे व्हॉइस चेअरमनपदी नंदू बोडके यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण १३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. सोसायट्यांची परिस्थिती नाजूक असल्याने […]

गोंदे दुमाला सोसायटीच्या चेअरमनपदी विजय कचरू नाठे, व्हॉइस चेअरमनपदी संजय अमृता नाठे बिनविरोध : स्वीकृत संचालकपदी गौतम रुंजा नाठे यांची वर्णी

इगतपुरीनामा न्युज, दि. २३ मोठी औद्योगिक वसाहत आणि जिल्हाभराच्या राजकारणात अतिशय महत्वाच्या असणाऱ्या गोंदे दुमाला विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी विजय कचरू नाठे यांची बिनविरोध निवड झाली आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आज पार पडलेल्या निवडणुकीत चेअरमन, व्हॉइस चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली. व्हॉइस चेअरमनपदावर संजय अमृता नाठे यांचीही बिनविरोध वर्णी लागली आहे. यासह सोसायटीच्या स्वीकृत […]

जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली शिरसाठे सोसायटीच्या १३ जागा बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. २० शिरसाठे आदिवासी विकास सोसायटी ही इगतपुरी तालुक्यातील महत्वाची असणारी सहकारी सोसायटी आहे. ह्या सोसायटीच्या निवडणुकीत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी बाजी मारली आहे. संपूर्ण १३ पैकी १३ जागा बिनविरोध करण्यात गोरख बोडके यांना चांगले यश मिळाले आहे. आगामी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा बँक निवडणूकीच्या अनुषंगाने ही बिनविरोध […]

संकटांच्या ढिगाऱ्यावर उभे राहून निर्विवाद कर्तृत्व मिळवणारा ८० वर्षाचा तरुण वाढोलीच्या चेअरमनपदी स्थानापन्न

लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरीनामा ग्रामीण लोकजीवनात वर्षानुवर्षे अनेक दाहक प्रश्नाशी झुंजणारी अनेक माणसं आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ज्वलंत परिणामांचा अनुभव असणारेही अनेक आहेत. मात्र आयुष्यभर लढा देऊन ह्या प्रश्नांवर उत्तरं शोधणारी व्यक्तिमत्व दुर्मिळ आहेत. याचप्रकारे आयुष्याची ८० वर्ष अनेकानेक आघाड्यांवर लढा देऊन यशाचे सुखद स्वप्न ज्यांनी प्रत्यक्षात साकार केले […]

error: Content is protected !!