बेलगाव कुऱ्हेच्या उपसरपंचपदी दिलीप भिका गुळवे बिनविरोध : काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली बिनविरोध निवडणुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दिलीप भिका गुळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडणुक झाली. अध्यासी अधिकारी म्हणून लोकनियुक्त सरपंच शुभांगी नंदराज गुळवे यांनी कामकाज पाहिले. पदाच्या माध्यमातून बेलगाव कुऱ्हे येथील गावकऱ्यांसाठी जीव ओतून काम करणार असल्याचे नवनियुक्त उपसरपंच दिलीप गुळवे यांनी सांगितले. निवडीच्या घोषणेनंतर ग्रामस्थांनी गुलाल उधळून आनंदोत्सव केला.

बेलगाव कुऱ्हे ही ग्रामपंचायत अतिशय महत्वाची म्हणून जिल्हाभर प्रसिध्द आहे. काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे यांचा येथे वरचष्मा असून त्यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतले जातात. ह्यानुसार रिक्त उपसरपंचपदासाठी आज निवडणुक घेण्यात आली. ह्या पदासाठी दिलीप भिका गुळवे यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. माजी सरपंच संतोष गुळवे, नंदराज गुळवे, भिका गुळवे, गेणू गुळवे यांनी बिनविरोध निवडीसाठी सहाय्य केले. दत्तू गुळवे, जालिंदर महाले, अनिल गुळवे, अंकुश गुळवे, संदीप गेणू गुळवे, अतुल गुळवे, मनोहर गुळवे, त्र्यंबक गुळवे, हरिश्चंद्र गुळवे, श्रीपत गुळवे आदी ग्रामस्थांनी यावेळी जल्लोष केला. निवडीच्या सभेवेळी सरपंच शुभांगी नंदराज गुळवे, ग्रामपंचायत सदस्य विजय कचरू बोराडे, सत्यभामा गेणू गुळवे, अर्चना समाधान महाले, मनीषा श्रीपत गुळवे, गौरव जगन्नाथ गाडे, ग्रामसेवक किरण अहिरे उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!