इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग आदिवासी विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. चेअरमनपदी नामदेव पारधी तर व्हॉइस चेअरमनपदी अर्जुन पोरजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी युवा नेते तथा माजी सरपंच साहेबराव उत्तेकर, जेष्ठ सभासद सुरेश पोरजे व आनंदा शिंदे यांनी मोलाची कामगिरी बजावली.
यावेळी संचालक मंडळ पुंजा भवारी, किसन शिद, गंगुबाई वारघडे, बच्चु पारधी, गोविंद भरीत, शिवाजी पोरजे, अशोक केदारे, हिरामण करवंदे आदी उपस्थित होते. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या शेवगेडांग सोसायटीच्या पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक ही प्रारंभी अत्यंत चुरशीची होईल अशी चर्चा होती. मात्र अगदी नाट्यमय घडामोडी घडत ही सोसायटी निवडणूक बिनविरोध झाली होती. चेअरमन व्हॉइस चेअरमन निवडीवेळी भास्कर पोरजे, विश्राम पोरजे, कैलास शिंदे, दिनकर पोरजे, भाऊराव ढुमणे, ज्ञानेश्वर पोरजे, आनंदा पोरजे, भिमा चहाळे, दशरथ चहाळे, लक्ष्मण भरीत, बंडु भरीत, विलास पोरजे, सचिव लक्ष्मण भरीत, संपत पोरजे, रघुनाथ भरीत, शिवराम पोरजे आदी उपस्थित होते.