इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यापूर्वी ९ संचालक बिनविरोध निवडून आले होते. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या १ जागेसाठी २ अर्ज दाखल झाल्याने निवडणुक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ह्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार गौतम सोनवणे यांची समजूत घालून निवडणुकीसाठी होणारा संभाव्य खर्च टाळण्यात आला. ह्यामुळे कुशेगाव सोसायटीची संपूर्ण निवडणुक बिनविरोध झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी योगेश गोराणे यांनी घोषित केले. जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालकांनी बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्न केले. सोसायट्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्याने निवडणुका घेणे हितावह नसल्याने अविरोध निवडणूक करण्यासाठी पुढाकार घेतला. अशाप्रकारे अन्य सोसायट्यांनी सुद्धा निवडणुका टाळाव्यात अशी अपेक्षा गोरख बोडके यांनी यावेळी व्यक्त केली.
कुशेगांव आदिवासी सहकारी सोसायटी निवडणुकीत हरी काशिराम सराई, येसु सकु सराई, येसु नवसु सराई, नवसु सखाराम खडके, पांडु सखाराम सराई, सक्रु दमा भस्मे
देवराम अंबु म्हसणे, अहिलाजी चिमाजी सोनवणे, मथुराबाई रावजी सराई हे संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत. आज चंद्रकांत रघुनाथ सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. गौतम सोनवणे यांनी माघार घेवून ह्या निवडीसाठी सहाय्य केले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक बिनविरोध झाली आहे. शेतकऱ्यांचा आत्मा असणाऱ्या सोसायट्यांनी निवडणुकांचा खर्च टाळून अविरोध निवडणुकांचा मार्ग धरावा असे आवाहन गोरख बोडके यांनी केले आहे. यावेळी नूतन संचालक आणि गौतम सोनवणे यांचा ग्रामस्थांतर्फे गोरख बोडके यांनी सत्कार केला.