इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
इगतपुरी तालुक्यातील साकुर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत गुरुवर्य हभप नागोराव महाराज शेतकरी विकास पॅनलचे 13 पैकी 12 उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले आहेत. परिवर्तन पॅनलचा पराभव करून वीस वर्षांची पारदर्शक सत्ता अबाधित ठेवली. पराभूत परिवर्तन पॅनलला एकच जागा मिळाली. मोठ्या पदांवर कामे करणाऱ्या नेत्यांनी नेतृत्व करूनही परिवर्तन पॅनलला नामुष्की लाभली. विजयी संचालकांसह पॅनलच्या शिलेदारांचे इगतपुरी तालुक्यात अभिनंदन होत आहे. विजयी पॅनलच्या यशासाठी भगवान सहाणे, संतोष जाधव, शंकर सहाणे, बहिरु सहाणे, त्र्यंबक सहाणे, शिवाजी सहाणे, शांताराम विठोबा सहाणे, शिवाजी विठोबा सहाणे, मुकुंदराव सहाणे, रामचंद्र सहाणे, कुंडलिक सहाणे, देविदास सहाणे, सुनील सहाणे, विठ्ठल आवारी, भाऊसाहेब सहाणे, कचरू बाबा सहाणे, केरू नाना सहाणे, बाळू शेळके, रामदास महाराज सहाणे, उत्तमराव कुकडे, सखाराम सहाणे, संजय सहाणे, सोपान सहाणे, दत्तात्रय सहाणे, सजन सहाणे, शांताराम आवारी, भरत आवारी, शिवाजी आवारी, बाळासाहेब घाडगे, सुरेश पावसे, गंगा कुकडे, शिवाजी गजीराम सहाणे, धोंडु सहाणे, धोंडु पावसे, तुकाराम कुकडे यांनी परिश्रम घेतले.
विष्णुपंत सहाणे, भिमराज सहाणे, भारत सहाणे, खंडेराव कुकडे, रावसाहेब सहाणे, दिनकर सहाणे, जगनराव सहाणे, तुकाराम सहाणे, सुरेश रणसुरे, त्र्यंबक आवारी, द्रोपदाबाई सहाणे, मुक्ताबाई घाडगे हे 12 संचालक विजयी झाले आहेत. स्वीकृत संचालक म्हणून किशोर सहाणे यांची निवड करण्यात आली. विजयी गुरुवर्य हभप नागोराव महाराज शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व माजी सभापती आनंदराव सहाणे, माजी चेअरमन जगनराव सहाणे, विष्णुपंत सहाणे, उपसरपंच दिनकर सहाणे, सरपंच विनोद आवारी, मधुकर सहाणे, समाधान सहाणे, कचरू सहाणे, भानुदास कुकडे आदींनी करून हा मोठा विजय संपादित केला. तर पराभूत झालेल्या परिवर्तन पॅनलचे नेतृत्व राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष उत्तमराव सहाणे, शिवसेना नेते गणपतराव सहाणे, यादवराव सहाणे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मनोज सहाणे, माजी सभापती गणपतराव सहाणे, माजी उपसरपंच शिवाजी सहाणे, माजी पोलीस पाटील पंढरीनाथ सहाणे यांनी केले होते. परिवर्तन पॅनलचे उत्तमराव सहाणे, युवराज उगले, गोपीनाथ गायकवाड, किसन सहाणे, हरिभाऊ सहाणे, गणपतराव सहाणे, रामचंद्र सहाणे, रामदास पावसे, नकुबाई कुकडे, शैला सहाणे,मारूती आवारी यांना पराभव पत्करावा लागला. परिवर्तन पॅनलचे नंदु सहाणे हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत.