अडसरे बुद्रुक सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी साबळे, व्हॉइस चेअरमनपदी किसनाबाई चौरे बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील सर्वात मोठी संस्था असलेल्या अडसरे बुद्रुक आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदांची निवड बिनविरोध पार पडली. चेअरमन पदासाठी शिवाजी साबळे,व्हॉइस चेअरमन पदासाठी किसनाबाई चौरे यांचे विहित मुदतीत एक एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध घोषित झाली.

यावेळी संचालक मधुकर कुंदे,जेंबु साबळे, ज्ञानेश्वर साबळे, हिरामण कातोरे, दिलीप साबळे, मंगल तातळे, मीराबाई साबळे,रामा कातडे, किशोर परदेशी, एकनाथ परदेशी, सरपंच संतु साबळे, ग्रामपंचायत सदस्य सदस्य शिवाजी चौरे, डॉ. चौरे, शिवाजी तातळे, मदन साबळे, किसन साबळे, सागर साबळे, शशिकांत कुंदे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, बाजार समितीचे संचालक सुनिल जाधव यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!