घोटी सोसायटीच्या चेअरमनपदी नामदेव शिंदे, व्हॉइस चेअरमनपदी रोहिदास जाधव बिनविरोध : उदय जाधव, संदीप गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३

इगतपुरी तालुक्यातील आर्थिक बाजारपेठ तथा राजकीय केंद्र असलेल्या घोटी सोसायटीच्या चेअरमनपदी नामदेव शिंदे व्हॉइस चेअरमनपदी रोहीदास जाधव यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणूकीकडे तालुक्याचे लक्ष लागून होते. घोटी सोसायटीच्या १३ जागापैकी शेतकरी विकास पॅनलच्या १२ जागा बहुमताने निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे यांच्या नेतृत्वाखाली चेअरमन व व्हॉइस चेअरमनपदाची निवडणूक बिनविरोध निवड झाली. निवडणुक संपन्न झाल्यावर विजयी उमेदवारांनी घोटी बाजार समितीमधील लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन आनंदोत्सव साजरा केला. सहकार क्षेत्रातील तथा मुख्य बाजार समितीच्या क्षेत्रात असलेल्या घोटी संस्थेवर अनेक राजकीय नेत्यांचे लक्ष लागून होते.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, शेतकरी विकास पॅनलचे संचालक त्र्यंबक लक्ष्मण गुंजाळ, दिलीप रामचंद्र जाधव, भाऊराव रामकृष्ण जाधव, संजय हरी जाधव, विजय रामकृष्ण गुंजाळ, नामदेव निवृत्ती शिंदे, रोहिदास जाधव, काशिनाथ धोंडू भगत, इंद्राबाई भास्कर पोरजे, जयाबाई नामदेव गुंजाळ, जगन शिवराम जगताप, विठ्ठल देवराम वालतुले यांच्यासह पांडुरंग शिंदे, किसन शिंदे, रेवननाथ गुंजाळ, उत्तम शिंदे, मंगेश शिंदे, विष्णु शिंदे, खंडु बोऱ्हाडे, तुकाराम शिंदे, विष्णु जाधव, विठ्ठल शिंदे, दिपक श्रीश्रीमाळ, समाधान गुंजाळ, चंदर जाधव, अर्जुन जाधव, दिपक नागरे, दयाराम गावांडे, यशवंत शिंदे, भास्कर पोरजे आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!