भरवीर ग्रामस्थांच्या एकीकरणातून सोसायटीची निवडणुक बिनविरोध : अरुण घोरपडे, खंडेराव शिवराम झनकर आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आनंद

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

इगतपुरी तालुक्यातील पुर्व भागात अत्यंत नावाजलेल्या आणि संपूर्ण इगतपुरी तालुक्याचे लक्ष लागलेल्या भरवीर बुद्रुक विविध सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध झाली आहे. ह्या सोसायटीमध्ये भरवीर बुद्रुक, भरवीर खुर्द आणि भंडारदरावाडीचा समावेश आहे. सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची केली असूनही निवडणुक बिनविरोध झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येवून मतभेद आणि मनभेद विसरून निवडणूक बिनविरोध केली. ग्रामविकास आणि शेतकऱ्यांचा विकास समोर ठेवून आम्ही काम करू. सर्वाचे आभार मानतो असे मनोगत सरपंच अरुण घोरपडे यांनी व्यक्त केले.

सोसायटी निवडणुकीत काम करणारे सर्वसमावेशक उमेदवार बिनविरोध निवडून गावाने नवीन आदर्श उभा केला आहे. सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते गावाच्या भल्यासाठी एकत्र आल्याचा मोठा आनंद वाटतो. आगामी काळात शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी नवनियुक्त संचालक मंडळ निश्चितच चांगले काम करील असा विश्वास वाटतो. सर्व गावकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन
- खंडेराव शिवराम झनकर

ह्या निवडणुकीत अरुण नामदेव घोरपडे, सुरेश पांडुरंग जुंदरे, संतू भिवा झनकर, सुरेश महादु झनकर, विष्णु अमृता झनकर, रतन बाबुराव झनकर, दत्तू दशरथ झनकर, मोहन पांडुरंग झनकर, विमल एकनाथ झनकर, सिंधु भाऊसाहेब म्हस्के, नंदू दादा टोचे, गेणू यशवंत टोचे, पार्वताबाई हरिश्चंद्र टोचे हे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना सौंदाणे यांनी घोषित केले. विजयी उमेदवारांचे सर्व गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. निवडणुक बिनविरोध करण्यासाठी सरपंच अरुण घोरपडे, खंडेराव शिवराम झनकर, मधुकर कोकणे, नवनाथ भाऊ झनकर, साहेबराव  झनकर, भगवान जुंदरे, संजय झनकर, साहेबराव रंगनाथ झनकर ,राधाकिसन झनकर, बहिरू झनकर, संजय जुंदरे, भरत झनकर, शिवाजी झनकर, दत्तू जुंदरे, रमेश टोचे, संपत टोचे, तुळशीराम टोचे, दत्तू पुंडे, राजू शिंदे आणि गावकऱ्यांनी महत्वाची भुमिका पार पाडली. सोसायटीची आर्थिक परिस्थिती समजून बिनविरोध निवडणुक झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

विविध विचारांच्या लोकांना एका छताखाली आणून सर्व गाव एकत्र असल्याचा संदेश तालुक्यात गेला. ही निवडणूक बिनविरोध करण्यात गावकरी आणि सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्यामुळे ग्रामस्थ खुश आहेत. बिनविरोध निवडुन आलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो. 
- नवनाथ झनकर

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!