ग्रामस्थांच्या एकजुटीतून वाडीवऱ्हे सोसायटीची निवडणुक झाली बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. २०

इगतपुरी तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे गाव असणाऱ्या वाडीवऱ्हे येथील वाडीवऱ्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अत्यंत अतीतटीच्या निवडणुकीचे वातावरण असतांना समस्त ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि जेष्ठ नागरिक यांनी पुढाकार घेऊन यनिमित्ताने गावाची एकी अबाधित ठेवली आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाल्याने वाडीवऱ्हे गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

ह्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे भास्कर चंदु कातोरे, हिरामण रामभाऊ कातोरे, भगवान चहादु कातोरे, नथु लक्ष्मण कातोरे, निवृत्ती तुकाराम राजोळे, राजाराम मुरलीधर मालुंजकर, बाळु मनाजी शेजवळ, समाधान सुकदेव गवते, कचरु खंडु लहांगे, भागिरथी रामदास मालुंजकर, रत्नाबाई रंगनाथ मालुंजकर, दत्तात्रय रोहिदास कातोरे, शिवाजी रामचंद्र चोथे यांना बिनविरोध निवडून देण्यात आले. निवडणुकीचा होणारा व्यर्थ खर्च तर वाचला पण यानिमित्ताने वाडीवऱ्हे गावाची एकी सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!