रायांबे सोसायटी निवडणुकीत सहकार विकास पॅनेलचे यश : नवनिर्वाचित संचालकांचा पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

रायांबे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सहकार विकास पॅनलने चांगले यश संपादित केले आहे. कर्जदार गटामधून रमेश एकनाथ धांडे, भगवान कचरु धांडे, यशवंत रामकृष्ण धांडे, ऋषिकेश अंबादास धांडे, बाळासाहेब मुरलीधर भोर, विष्णु पांडुरंग धांडे, रावजी बाबुराव धांडे, ज्ञानेश्वर विठोबा धांडे, महिला राखीव गटातून कमलाबाई चिंधु भोर, सुमनबाई रघुनाथ धांडे, आदिवासी राखीव गटातून चंदर जाखु पिंगळे यांची निवड झाली आहे.

नवनिर्वाचित संचालकांचे इगतपुरी तालुक्यातील विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, घोटी बाजार समिती संचालक सुनिल जाधव, रामचंद्र गायकर, दिलीप मुसळे व अंबादास धोंगडे आदींनी नूतन संचालकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!