वाढोली सोसायटीच्या चेअरमनपदी विश्राम महाले ; व्हॉइस चेअरमनपदी गणपत महाले बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या वाढोली सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी विश्राम भाऊराव महाले तर व्हॉइस चेअरमनपदी गणपत महाले यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी माजी चेअरमन रतन महाले, माजी सरपंच रामभाऊ महाले, यशवंत महाले, कचरु महाले, शंकर ढगे, निवृत्ती महाले, प्रेमराज महाले, कारभारी महाले, पंढरी महाले, तुकाराम महाले, सोपान महाले, दशरथ महाले, […]

अडसरे बुद्रुक आदिवासी सोसायटी निवडणुकीत नवख्या परिवर्तन शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय : शेतकरी विकास पॅनलच्या पदरात फक्त भोपळाच

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ इगतपुरी तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या अडसरे बुद्रुक आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या एकूण १३ पैकी ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तरुणांनी उभ्या केलेल्या नवख्या उमेदवारांच्या परिवर्तन शेतकरी विकास पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. २ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. त्यात भटक्या विमुक्त जातीमध्ये एकनाथ परदेशी तर इतर मागास प्रवर्गात […]

पाडळी देशमुख सोसायटीच्या चेअरमनपदी विष्णु पाटील धोंगडे तर व्हॉइस चेअरमनपदी विलास धांडे बिनविरोध : ॲड. संदीप गुळवे यांच्या नेतृत्वाखाली झाली निवड प्रक्रिया

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ इगतपुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या पाडळी देशमुख सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी विष्णु पाटील धोंगडे तर व्हॉइस चेअरमनपदी विलास रामचंद्र धांडे यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा बँकेचे संचालक तथा काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवड करण्यात आली. इगतपुरी तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू असुन […]

सभापती विठ्ठल लंगडे यांच्या नेतृत्वाखाली कांचनगाव सोसायटीच्या चेअरमनपदी संतु भगत तर व्हॉइस चेअरमनपदी बाळा गव्हाणे बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ कांचनगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन पदांची निवड शिवसेनेचे गटनेते तथा इगतपुरी पंचायत समितीचे सभापती विठ्ठल लंगडे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध करण्यात आली. चेअरमनपदी संतु रामा भगत तर व्हॉइस चेअरमनपदी प्रकाश ( बाळा ) त्र्यंबक गव्हाणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी परदेशी यांनी घोषित केले. सोसायटीच्या […]

वाढोली सोसायटीत प्रस्थापितांना नम्रता पॅनलकडून दणका : विरोधी शेतकरी विकास पॅनलच्या झोळीत फक्त भोपळा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या वाढोली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये परिवर्तन घडले आहे. प्रस्थापितांना दणका देऊन विविध आघाड्यांवर एकजुटीने काम करत  नम्रता पॅनलने चांगलीच बाजी मारली आहे. विरोधी शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व मनोहर महाले, पाराजी महाले, हिरामण भगत आदींनी केले. मात्र सर्वांच्या पदरात पराभव पडला. शनिवारी झालेल्या मतमोजणीमध्ये नम्रता पॅनेलचे १२ […]

अडसरे बुद्रुक सोसायटी निवडणूक : आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी परिवर्तन शेतकरी विकास पॅनेलची निर्मिती

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ अडसरे बुद्रुक आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत नवतरुणांनी जेष्ठांच्या सहाय्याने निवडणुकीत उडी घेतली आहे. आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी परिवर्तन शेतकरी विकास पॅनेलची निर्मिती केली असून कपबशी ही निवडणूक निशाणी पॅनलने घेतली आहे. रविवारी १५ मे ह्या दिवशी सकाळी ८ ते  ४ या वेळेत मतदान घेतले जाणार आहे. सामान्य आदिवासी माणसाच्या […]

अडसरे बुद्रुक आदिवासी सहकारी सोसायटीत २ जागा बिनविरोध : ११ जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ इगतपुरी तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या अडसरे बुद्रुक आदिवासी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक सुरू आहे.१३ संचालकांच्या जागेसाठी असलेल्या निवडणूक  प्रक्रियेत आज झालेल्या माघार प्रक्रियेनंतर २ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. बी. नढे यांनी घोषित केले. उर्वरित ११ जागांसाठी २१ उमेदवार उभे असून त्यात सरळ लढती […]

गोंदे दुमाला सोसायटी मतदारांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू – इंदिरा काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव : सहकार विकास पॅनेलच्या विजयाचा इगतपुरी तालुक्यात बोलबाला

इगतपुरीनामा न्यूज, दि. २ गोंदे दुमाला विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर आमच्या सहकार विकास पॅनेलने मिळवलेला विजय हा आमच्या सर्वांच्या एकजुटीचा विजय आहे. मतदारांच्या मनात असलेले आदराचे स्थान अबाधित असल्याची ही पोचपावती आहे. विविध भुलभुलैया दाखवून मतदारांवर निर्माण केलेला दबाव काम करू शकला नाही. सर्वच्या सर्व जागा आमच्या पारड्यात टाकणाऱ्या मतदारांचे मनापासून आभार मानतो असे प्रतिपादन […]

गोंदे दुमाला सोसायटीवर सहकार विकास पॅनलचा दणदणीत विजय : संपूर्ण १२ जागांवर विजय संपादन करून सत्ता स्थापन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २ इगतपुरी तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या असणाऱ्या गोंदे दुमाला विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सहकार विकास पॅनलने दणदणीत विजय संपादन केला आहे. सोसायटीच्या निवडणुकीसाठी मतदारांनी भरभरून मतांचे दान सहकार विकास पॅनलच्या पारड्यात टाकले. इगतपुरी तालुक्यात ह्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांचे विशेष लक्ष लागले होते. सहकार विकास पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच गणपत जाधव, […]

३३ जिल्ह्यातील २ हजार ४७० ग्रामपंचायतीच्या ३ हजार २५३ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर : नाशिक जिल्ह्यात १८२ जागांसाठी होईल निवडणूक

इगतपुरीनामा न्यूज, दि. २ राज्य निवडणूक आयोगाने निधन, राजीनामा, अपात्रता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या रिक्त झालेल्या जागांचा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात 33 जिल्ह्यातील 2 हजार 470 ग्रामपंचायतींच्या 3 हजार 253 जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील 122 ग्रामपंचायतीच्या 182 जागांसाठी ही पोटनिवडणुक होईल. ५ मे रोजी तहसीलदार स्तरावरून पोटनिवडणुकीची […]

error: Content is protected !!