श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानतर्फे लोकसेवार्पण सोहळा संपन्न इगतपुरीनामा न्यूज : अतिदुर्गम आदिवासी भागातील वंचित, कष्टकरी, गरीब आणि गरजू असणाऱ्या सर्वच रुग्णांना आरोग्याच्या विविध सुविधा एकच छताखाली मिळणार आहेत. लोकांच्या हृदयातील परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान नेहमीच अग्रेसर आहे. पालघर, जव्हार, हरसूल आणि लगतच असणारा गुजरातचा भाग, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक जिल्ह्याला स्वामी विवेकानंद […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील धारगांव येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) मार्फत परंपरागत कृषी विकास योजनेत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. प्रशिक्षणानुसार शेतकऱ्यांचे शेतकरी गट तयार करून विषमुक्त अन्न तयार करण्याकडे वाटचाल, चांगला ग्राहक निर्माण करून आर्थिक उत्पादन वाढविणे यासाठी काम करण्यात येणार […]
इगतपुरीनामा न्यूज – मारहाण केल्याप्रकरणी युवा नेते मिथुन राऊत यांच्यावर आणि त्यांचे इतर १० सहकारी यांच्यावर २०१२ मध्ये हरसुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर नाशिकचे जिल्हा न्यायाधीश कोल्हापुरे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. त्यानुसार आज तब्बल १२ वर्षांनी अकरा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. बारा वर्षापुर्वी गुन्हा दाखल केल्यानंतर अनेक वर्षांपासून हा […]
इगतपुरीनामा न्यूज – पोलिसांनी स्थानिक नागरिक, शांतता समिती यांची बैठक घेऊन त्र्यंबकेश्वरचे प्रकरण शांततेने मिटवले असतांनाच पुण्यातील हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे व त्यांचे सहकारी यांनी मंदिर प्रवेशद्वारावर आंदोलन केले. तुषार भोसले यांच्या आक्षेपार्ह विधानाने शांतता भंग, सामाजिक तेढ आणि श्रद्धेच्या नावाखाली सामाजिक सलोखा बिघडला आहे. भाजपा आमदार नितेश राणे, अशोक उईके यांनी पत्रकार परिषद […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील इंदिरा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विविध महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजकारण यामुळे ढवळून निघाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ह्या पक्षांतरामुळे गणिते बदलली जाणार आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असल्याचे रवींद्र भोये, मिथुन राऊत यांनी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ – इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे येथे गट क्रमांक १७६ ह्या जमीनीबाबत तत्कालीन प्रांतधिकारी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर यांचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून दिला. त्र्यंबकेश्वर तहसीलचा वाहनचालक अनिल बाबुराव आगीवले याने त्याच्या मोबदल्यात २ लाखांची लाच मागितली होती. त्याला याआधी ५० हजार दिले होते. उर्वरित दीड लाख घेताना अनिल बाबुराव आगीवले याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – देशातील सर्व धर्मांतरित आदिवासींच्या शासकीय योजना व सवलती बंद कराव्या असा ठराव चिंचवड खोरीपाडा येथील धर्मसभेत एकमताने मांडण्यात आला. हभप काशिनाथ महाराज भोये ओझरखेड धाम यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतनानिमित्त 1008 महांडलेश्वर रघुनाथ देवबाप्पा फरशीवाले बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड खोरीपाडा येथे धर्म संसद व शाही मिरवणुक काढण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील विविध […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड येथे महामंडलेश्वर काशिनाथ महाराज यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त प्रथमच आदिवासी परिसरात धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. 1008 महामंडलेश्वर रघुनाथ महाराज देवबाप्पा, हभप संदीपान महाराज अध्यक्ष जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्या मार्गदर्शनाखाली 6 फेब्रुवारीला हा कार्यक्रम होत आहे. कैलास मठाचे संविधानंद सरस्वती महाराज, देवाची […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० – नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यात ओझरखेड, सादडपणा ( मुलवड ) हिवाळी ( बेरवळ ) हरसूल येथे ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. ओझरखेड येथील ५ टक्के पेसा अबंध निधी नमुने, सर्व योजनांच्या ऑनलाईन कामकाजाचा आढावा, १५ वा वित्त आयोग, घरपट्टी आणि […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव भागातील एक अविवाहित गरोदर मुलगी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल आहे. त्या मुलीने गरोदर असल्याचा खुलासा केला. म्हणून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावीहर्ष येथील बळजबरी करून गरोदर करणाऱ्या युवकाचे नाव घेतले. याबाबत खात्री करण्यासाठी घोटी पोलिसांनी पोलीस पाटलाच्या मार्फत संबंधित तरुणाला संपर्क साधला. यामुळे घाबरलेल्या ह्या तरुणाने आपले जीवन संपवून […]