घोटीत सर्व कंपन्याच्या मेडिक्लेमसाठी मातोश्री हॉस्पिटलमध्ये तत्परतेने विविध आरोग्य सेवा उपलब्ध : सर्व प्रकारचे मोठे ऑपरेशन, वैद्यकीय सुविधा, जीवनदायी योजना आणि नामवंत डॉक्टरांकडून नागरिकांना मिळतात सुविधा

इगतपुरी तालुक्यात लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलेले मातोश्री हॉस्पिटल भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ इगतपुरी तालुका म्हणजे दुर्गम आणि आदिवासी तालुका.. ह्या तालुक्याच्या नागरिकांना आरोग्याच्या सुविधा हव्या असतील तर थेट नाशिक गाठावे लागते. त्यामुळे आटोग्याची चिंता असणाऱ्या लोकांना आता चिंतामुक्त होण्याची संधी आहे. अनेक नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या घोटी येथील मातोश्री हॉस्पिटलमध्ये नाशिक मुंबईमध्ये […]

विजय अस्सल बावनकशी दमदार नेतृत्वाचा… विजय दादासाहेबांच्या विचारांचा आणि उदय दूरदृष्टीच्या सक्षम नेतृत्वाचा

लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरी तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यांत शिक्षणाची दारणामाई ज्यांच्यामुळे वाहत आहे असे इगतपुरी तालुक्याचे अग्रणी शिक्षणमहर्षी लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे यांचे वारसदार ॲड. संदीप गोपाळराव गुळवे यांचा मविप्र संचालकपदाच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी ऐतिहासिक विजय झाला. अनेक संकटे, दबा धरून बसलेले विरोधक, अनेक कारस्थाने आदींच्या नाकावर टिच्चून ॲड. संदीप […]

उत्तर महाराष्ट्रातील क्रमांक एकच्या श्री संग्राम गोविंदा पथकाने फोडली ७ थरांची सर्वात उंच दहीहंडी

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ गोकुळाष्टमीला पहाटपासून मानाच्या दहीहंडीची लगबग… अनेक दिवसांचा सराव पूर्णत्वाकडे नेण्यासाठी धडपड… लहानग्यांचा आनंद… गोविंदा गीतांचा तालबद्ध आवाज… कोणताही क्षण न चुकवण्यासाठी डोळे विस्फारलेले मान्यवर… महिला आणि गावकऱ्यांकडून गोविंदांना उत्साह देण्याचे कार्य आणि पर्जन्यराजाची हजेरी अशा ऐटदार सोहळ्याला नाशिक जिल्ह्यासह तालुकाभरातून हजारोंची उपस्थिती लाभली. अन यापूर्वी सर्वाधिक थराचा विक्रम […]

जळजळीत भयानकता – “आदिवासी दिन म्हंजी काय रं भाऊ ?” : “समृद्धी”च्या वाटेवरील इगतपुरी तालुक्यातले दाहक वास्तव !

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ आदिवासींचा तालुका म्हणून गणल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात ज्यांच्या अस्तित्वाचीच दखल घेतली जात नाही असे आदिवासी अजूनही आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची तयारी एकीकडे सुरू असतांना दुसरीकडे हे भयाण वास्तव अस्वस्थ करणारे आहे. जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या इगतपुरी तालुक्यात अस्वली स्टेशन गावाजवळ नदीकाठच्या खडकांवर रहात असलेल्या आदिवासी कुटुंबातील […]

नागपंचमी विशेष : जाणून घेवूया सापांबद्दल

सापांबद्दल अनेक समज-गैरसमज आपण सगळेच बाळगून आहोत. आज नाग पंचमीच्या निमित्ताने याबद्दल सविस्तर माहिती देत आहेत डॉ. सुधीर कुंभार आणि प्रवीण शिंदे.. चला तर मग, या व्हिडिओच्या माध्यमातून वस्तुस्थिती जाणून घेऊया ! खालील लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पहा.

नागपंचमी विशेष : विषाची परीक्षा आणि साक्षात मृत्यूचे दर्शन घडवणारा अघोरी खेळ

इगतपुरीनामा न्यूज, दि. २ साप म्हटला की अनेकांना दरदरून घाम फुटतो तर काहींची बोबडी वळते. यापूर्वी सापांविषयी अनेक गैरसमज असल्याने ‘दिसला की ठेचला’ या वृत्तीने मारले जायचे. सापांविषयी गैरसमज दूर व्हावेत, लोकांचे प्रबोधन व्हावे आणि सापांना जीवदान मिळावे यासाठी मध्यंतरी सर्पमित्रांनी मोहीम हाती घेऊन सर्प वाचविण्यासाठी प्रयत्न केलेत. या मेहनतीचे फळ आता ग्रामीण भागात दिसू […]

नवे नेतृत्व निर्मित करणारे आणि अनेकांच्या मनसूब्यांवर पाणी फिरवणारे आरक्षण : इगतपुरी तालुक्यातील गट आणि गणांच्या निवडणुकीचा मागोवा

लेखन – भास्कर सोनवणे, मुख्य संपादक महत्वाची सूचना : ह्या लेखाची कॉपी करण्याला परवानगी नाही. वाडीवऱ्हे ह्या जिल्हा परिषद गटातून इगतपुरी तालुक्याला नवे नेतृत्व निर्मित करुन देणारे आरक्षण पडले असल्याची ऐतिहासिक बाब आहे. वर्षानुवर्षे प्रस्थापित राजकीय नेत्यांना सहाय्य करणाऱ्या तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांचे नवे नेतृत्व ह्या गटामधून इगतपुरी तालुक्याला लाभणार आहे. घोटी ह्या महत्वपूर्ण गटातुन अभूतपूर्व […]

महावितरणच्या पठ्ठ्याची कमाल – अर्धा किमी पोहत जाऊन खांबावर चढून विजेची केली दुरुस्ती : इगतपुरी तालुक्यातील वीज कर्मचाऱ्याच्या अभूतपूर्व कामाची चर्चा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करतात. असे असले तरी काही कर्मचारी यापेक्षा अभूतपूर्व काम करतात. याचे उदाहरण इगतपुरी तालुक्यातील रायांबे येथे घडले आहे.इगतपुरी तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रायांबे येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता महावितरणचे कर्मचारी अमोल […]

इगतपुरी तालुक्यातील एक माजी आमदार एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर ? : नवी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित भेटीमुळे चर्चा रंगली

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात शिवसेना दुभंगवणारे वादळ उभे केले. त्याप्रसंगात आणि शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना झाली त्यानंतरच्याही प्रसंगात स्थिर आणि जैसे थे राहिलेले इगतपुरी तालुक्यातील कट्टर शिवसैनिक दिसून आले. मात्र इगतपुरी तालुक्यातील एक माजी आमदाराच्या रूपाने आता तालुक्यातील शिवसेना फुटीच्या वाटेवर आली असल्याची चर्चा इगतपुरी तालुक्यात रंगली आहे. त्यांच्यामुळे एक […]

कोणत्या गट आणि गणात काय असेल आरक्षण ? : कोणाची होणार सोय आणि कोणाची होणार गोची ?

लेखन – भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरीनामा इगतपुरी तालुक्यात जिल्हा परिषदेचे ५ गट असून पंचायत समितीचे १० गण आहेत. ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यामुळे आणि तत्कालीन राज्य सरकारने केलेल्या घेतलेल्या निर्णयांमुळे मुदत संपूनही प्रशासकीय राजवट लावण्यात आलेली आहे. ह्या स्थानिक स्वराज्य संस्था मिनी मंत्रालय असल्याने विकासाची अनेक कामे लोकप्रतिनिधी करू शकतात. त्यामुळे निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये […]

error: Content is protected !!