काय सांगता? सर्वच विषयात पस्तीस मार्क?

इगतपुरीनामा न्यूज : परीक्षेतील गुण हा आकड्यांचा खेळ असला तरी यातही काही गमतीदार उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. असेच एक गमतीदार आकड्यांचे उदाहरण आम्ही आज दाखवणार आहोत.

आजच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल म्हटलं की कुणाला किती गुण मिळाले असतील याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. घसघशीत गुण मिळवून पास होणाऱ्यांचं कमी गुण मिळवून पास होणाऱ्यांचं होत नाही. त्यातल्या त्यात एखाद्या विषयात जर एखाद्याला अवघे पस्तीस गुण असतील तर तो अगदीच काठावर पास समजला जातो. एखाद्या विषयात काठावर पास आपण समजू शकतो पण एखादा विद्यार्थी सर्वच विषयात काठावर पास होत असेल तर? आश्चर्य वाटले ना! पण ही अशक्य वाटणारी गोष्ट एका विद्यार्थ्याने शक्य करून दाखवली आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या बोरी खुर्द येथील वैभव कृष्णा मोरे या दहावीच्या विद्यार्थ्याने यंदा ही कमाल करून दाखवली आहे. आजच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात त्याला सर्वच विषयात मोजून पस्तीस गुण मिळाले आहेत. त्यामुळे सगळीकडेच हा चर्चेचा विषय ठरत आहे. वैभवची गुणपत्रिका सोशल मीडियामध्ये चांगलीच व्हायरल झाली असून सर्वच विषयात पस्तीस गुण मिळवून त्याने एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे, असेच म्हणावे लागेल.

Similar Posts

error: Content is protected !!