गोरख बोडके यांच्या साहाय्याने पाय गमावलेला अमोल जागले चालणार स्वतःच्या पायांवर : जर्मनीचे डॉ. आदित्य वडगावकर यांचे मिळणार विशेष सहाय्य

इगतपुरीनामा न्यूज – गोरगरिबांच्या घरात आपल्या दैदीप्यमान सामाजिक कार्यामुळे आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करणारे देवदूत म्हणून गोरख बोडके सर्वत्र ओळखले जातात. दिवाळी काळातील आपल्या अभिनव कार्याचा वारसा त्यांनी ह्या वर्षीही जपला आहे. अनेकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे वीज मंडळाचे तत्कालीन जागरूक कर्मचारी अमोल जागले सध्याच्या स्थितीत पाय एक नसल्यामुळे संकटग्रस्त अवस्थेत आहेत. त्यांना एका महिन्यात स्वतःच्या दोन्ही पायांवर चालवण्यासाठी गोरख बोडके यांनी कंबर कसली आहे. नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य देवदूत व्यक्तिमत्व डॉ. अतुल वडगावकर यांच्यासह गोरख बोडके यांनी अमोल जागले यांच्या घरी दिवाळीनिमित्त भेट दिली. एक पाय कापलेल्या ठिकाणी अस्सल असा नवीन कृत्रिम पाय बसवण्यासाठी गोरख बोडके यांनी आज नियोजन केले. जर्मनी येथील विशेषज्ञ डॉ. आदित्य वडगावकर यांनीही यावेळी अमोल जागले यांच्या संपूर्ण प्रकरणी सविस्तर माहिती घेतली. एका महिन्यात पाय बसवण्यासाठी जर्मनी येथील तज्ञांकडून विशेष मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. हा पाय बसवल्यानंतर अमोल जागले हे स्वतःच्या पायावर पूर्वीप्रमाणे चालू शकणार आहेत. मागील वर्षी वीजेच्या खांबावर तत्परतेने काम करीत असताना झालेल्या अपघातात अमोल जागले यांचा पुनर्जन्म झालेला असला तरी शस्त्रक्रियेनंतर त्यांचा एक पाय कापावा लागला. यामुळे ते व्यथित होऊन आत्महत्येच्या परिस्थितीत आलेले होते. दिवाळीच्या मंगल पर्वावर इगतपुरी तालुक्यातील देवदूत गोरख बोडके धावून आल्यामुळे निश्चितच नवीन पाय मिळणार असल्याने अमोल जागले यांना डोळ्यातून आनंदाच्या धारा आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष अशी अनेक पदे गोरख बोडके भूषवत असून आज अमोलच्या कुटुंबाला त्यांनी मोठी दिवाळी भेट दिल्याने सर्वांनी आभार मानले. अवघे २८ वर्ष वय असणाऱ्या अमोल जागले ह्याला खऱ्या अर्थाने स्वयंसिद्ध करण्यासाठी यापूर्वीही लाखो रुपयांची मदत केलेली आहे. आता त्याला सर्वासामान्य माणसाप्रमाणे जगण्यासाठी पाय बसवून देत आहोत. याकामी नाशिकचे देवदूत डॉ. अतुल वडगावकर, जर्मनीचे डॉ. आदित्य वडगावकर आणि मित्र सहकाऱ्यांच्या मदतीने ५ लाख खर्च करणार आहोत. अमोलला चालतांना पाहण्यासाठी मी स्वतः आतुर आहे असे यावेळी गोरख बोडके म्हणाले.

Similar Posts

error: Content is protected !!