महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकास्तरीय पुरस्कार जाहीर : १३ जानेवारीला गोंदे दुमाला येथे होणार पुरस्कार वितरण सोहळा

इगतपुरीनामा न्यूज – ११० वर्ष परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्वात मोठ्या व जुन्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे दरवर्षी इगतपुरी तालुक्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. गुणवंत व्यक्ती, शिक्षक आणि शाळा यांना हा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचे पुरस्कार घोषित करण्यात आले असून शनिवारी १३ जानेवारीला गोंदे दुमाला येथील लक्ष्मी लॉन्स येथे होणारा […]

पेहेचान प्रगती फाउंडेशनचे आदर्श सामाजिक कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी – पोलीस निरीक्षक राजू सुर्वे : पेहेचान प्रगती फाउंडेशनतर्फे गुणवंतांना प्रगती सन्मान पुरस्कार प्रदान

इगतपुरीनामा न्यूज – आदिवासी दुर्गम भागात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांच्या सर्वोत्तम कार्यामुळे सुजाण समाजाची नवीन पिढी निर्माण होत आहे. आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी नव्या विचारांची सुसज्ज आणि सुसंस्कृत फौज शिक्षकांच्या योगदानामुळे तयार होत आहे. ह्या गुणवंत शिक्षकांच्या उज्वल कार्याची पेहेचान प्रगती फाउंडेशनकडून दरवर्षी दखल घेऊन त्यांना प्रगती सन्मान पुरस्काराचे पाठबळ दिले जाते आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण शैक्षणिक […]

निनावीच्या उपक्रमशील शिक्षिका सुशीला चोथवे यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी विविध प्रयोग

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज  – विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. शैक्षणिक क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकीत नवनव्या अमृतधारा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे काम केले जाते. त्यानुसार उपक्रमशील शिक्षिका सुशीला मधुकर चोथवे विविध उपक्रम, प्रयोगातून बौद्धिक व शारीरिक जडणघडणीसाठी विद्यार्थी सक्षमीकरणाचा अजेंडा घेऊन अखंड कार्यरत आहेत. इगतपुरी तालुक्यातील निनावी येथील जिल्हा परिषद शाळेच्या त्या शिक्षिका […]

“लक्ष्मी, गौरी, गायत्री” कडून बेवारस मुलीला मिळाला मायेचा आधार : “केपीजी”च्या विद्यार्थिनींनी जपली माणुसकी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील केपीजी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी लक्ष्मी पदमेरे, गौरी भोर, गायत्री भोर यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी महाविद्यालयाबाहेर महामार्गावर फिरणाऱ्या अनाथ, बेवारस, व मूकबधीर मुलीला आधार दिला. तिची देखभाल करीत तिला जेवण, जॅकेट, चपला देत काळजी घेतली. याबाबत माहिती समजताच महाविद्यालयाने पोलिसांनी माहिती देऊन संबंधित मुलीच्या पालकांचा शोध […]

पत्रकार आणि महाविद्यालय यांचा समन्वय समाज परिवर्तनाला सहाय्यक – प्राचार्य डॉ. किरण रकिबे : केपीजी महाविद्यालयात पत्रकारांचा स्नेह मेळावा उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात प्राचार्य म्हणून डाॅ. किरण रकिबे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे. ह्या उपक्रमांसह आगामी उपक्रमांची माहिती, महाविद्यालय सुधारणा व विकास योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. मविप्रचे संचालक ॲड. संदिप गुळवे यांच्या मार्गदर्शनाने झालेल्या स्नेह मेळाव्यात […]

रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीकडून नेशन बिल्डर पुरस्काराचे वितरण : दिमाखदार सोहळ्यात २१ शिक्षकांच्या कार्याचा झाला गौरव

इगतपुरीनामा न्यूज – भारतीय संस्कृती आणि राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे मोलाचे योगदान असून गुरूला सन्मान देणाऱ्या परंपरेची जोपासना केली जाते. त्यानुसार रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीकडून गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा कार्यक्रम हॉटेल करी लिव्हज येथे मोठ्या दिमाखात पार पडला. अभय मुजुमदार यांनी सर्वांचे स्वागत केले. रोटरी क्लब […]

सरकारी शिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी पंजाब, दिल्ली आदर्श ! : पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांच्या भेटीनंतर आ. सत्यजीत तांबे यांची प्रतिक्रिया

इगतपुरीनामा न्यूज – देश विदेशातील शिक्षणपद्धतीसोबतच भारतातील विविध राज्यांच्या शिक्षणव्यवस्थेतील उत्तम गोष्टी टिपून त्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्याचा प्रयत्न करणारे आमदार सत्यजीत तांबे यांनी पंजाबचे शिक्षणमंत्री हरज्योतसिंग बैस यांची भेट घेतली. सध्या वैयक्तिक कारणासाठी पंजाबच्या भेटीवर असलेल्या आ. तांबे यांनी आपल्या कामातून वेळ काढून शिक्षणमंत्र्यांशी शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा केली. तसंच पंजाबमधील शिक्षणाचं मॉडेल समजून […]

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी इगतपुरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे प्रभावी पथनाट्य

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव या विषयावर पथनाट्य सादर केले. पथनाट्यास प्राचार्य प्रतिभा हिरे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन त्यांचा उत्साह वाढवला. गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर तो पर्यावरणाला हानिकारक न होता पर्यावरणाला पूरक असा असावा. पर्यावरणाचे संरक्षण होईल असा संदेश देण्यात आला. […]

जन्म दाखला ठरतोय “आधार” मध्ये अडसर! : भटका समाज आणि आदिवासी विद्यार्थी शाळाबाह्य होण्याचा धोका

इगतपुरीनामा न्यूज : आधार कार्ड धोरणांमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या बदलांमुळे आता नवीन आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी जन्म दाखला पुरावा जोडणे बंधनकारक आहे. जन्म दाखल्याशिवाय अन्य कुठलाही पुरावा यासाठी ग्राह्य मानला जात नाही. यापूर्वी जन्म दाखला नसला तरी केवळ रहिवासी दाखला आणि इतर कागदपत्रांच्या आधारे सुध्दा नवीन आधार कार्ड नोंदणी करणे शक्य होते, मात्र या वर्षी […]

यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्ने पाहणे हा जीवनाचा मुलमंत्र असावा – प्रा. डॉ. स्मिता सोनवणे : चिंतामणी बहुउद्देशीय संस्थेतर्फे २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – विद्यार्थी जीवनात प्रामाणिक प्रयत्न आणि परिश्रम घेऊन ध्येय निश्चित केल्यास यश प्राप्त होते. गुणवत्तेला कार्यक्षमतेची जोड देऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज हितासाठी करावा. संघर्ष केल्याशिवाय कोणतेही स्वप्न पूर्ण होणार नाही. पराजयात मोठ्या विजयाची नांदी लपलेली असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्ने पाहणे हा जीवनाचा मुलमंत्र असला पाहीजे असे प्रतिपादन व्ही. एन. नाईक […]

error: Content is protected !!