इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील केपीजी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी लक्ष्मी पदमेरे, गौरी भोर, गायत्री भोर यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी महाविद्यालयाबाहेर महामार्गावर फिरणाऱ्या अनाथ, बेवारस, व मूकबधीर मुलीला आधार दिला. तिची देखभाल करीत तिला जेवण, जॅकेट, चपला देत काळजी घेतली. याबाबत माहिती समजताच महाविद्यालयाने पोलिसांनी माहिती देऊन संबंधित मुलीच्या पालकांचा शोध लावण्यासाठी तिला पोलिसांकडे सुपूर्द केले. मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, संचालक ॲड. संदिप गुळवे, इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, प्राचार्य डॉ. किरण रकिबे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, आणि इतर विद्यार्थी यांनी विद्यार्थिनींच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आहे. इगतपुरी पोलिसांनी मुलीच्या पालकांचा शोध घेऊन तिला त्यांच्या ताब्यात दिले. महिला, मुलींना आधार आणि सहकार्य करून महाविद्यालयाने समाजासमोर आदर्श ठेवला आहे. महाविद्यालयातील लहान मुलीची काळजी घेणाऱ्या विद्यार्थिनींचे प्राचार्य डॉ. किरण रकिबे कौतुक केले आहे. या विद्यार्थिनींचे पोलीस प्रशासन आणि महाविद्यालयातर्फे ग्रंथ भेट देण्यात आले. याप्रसंगी प्रा. आर. एम. आंबेकर उपस्थित होते.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group