पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी इगतपुरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे प्रभावी पथनाट्य

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव या विषयावर पथनाट्य सादर केले. पथनाट्यास प्राचार्य प्रतिभा हिरे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन त्यांचा उत्साह वाढवला. गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर तो पर्यावरणाला हानिकारक न होता पर्यावरणाला पूरक असा असावा. पर्यावरणाचे संरक्षण होईल असा संदेश देण्यात आला. गणेशाची पीओपी किंवा इतर मूर्ती न आणता शाडूच्या मातीचे किंवा साध्या मातीच्या मुर्त्या बनवून त्यांची स्थापना करावी. थर्माकोल प्लास्टिक व महागड्या वस्तूंचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने सजावट केल्यास पर्यावरणाचा समतोल साधला जाईल. गणेश मूर्ती नदीत व समुद्रात विसर्जित न करता ती जर साध्या मातीची असेल आणि घरातच विसर्जन केल्यास समुद्रातील व नदीतील जीव जंतूंचे व वनस्पतींचे संरक्षण होईल. पाणी शुद्ध राहील. डीजेवर मोठमोठ्या आवाजात गाणे न वाजवता सौम्य आवाजात गाणे वाजवल्यास ध्वनी प्रदूषण होणार नाही. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होऊ शकते. पथनाट्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. पथनाट्यासाठी प्रा. जयश्री भालेराव यांनी मार्गदर्शन केले. प्रा. ज्योती सोनवणे, प्रा. भाग्यश्री मोरे, प्रा. कांतीलाल दुनबळे, प्रा. अविनाश कासार आदी उपस्थित होते. पथनाट्य शाळेचे पटांगण, महाविद्यालय, भाजी मार्केट, इच्छापूर्ती गणेश मंदिर आणि विविध ठिकाणी सादर करण्यात आले.

Similar Posts

error: Content is protected !!