इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात प्राचार्य म्हणून डाॅ. किरण रकिबे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे. ह्या उपक्रमांसह आगामी उपक्रमांची माहिती, महाविद्यालय सुधारणा व विकास योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. मविप्रचे संचालक ॲड. संदिप गुळवे यांच्या मार्गदर्शनाने झालेल्या स्नेह मेळाव्यात पत्रकारांनी उत्फुर्त सहभाग घेतला. प्राचार्य डाॅ. किरण रकिबे यांनी सामाजिक परिवर्तनात महाविद्यालये, प्रसार माध्यमे आणि पत्रकार प्रतिनिधी यांची भूमिका मोलाची आहे. ह्या दोन्ही घटकांचा संवाद उपयुक्त असल्याने महाविद्यालयात विविध उपक्रम राबविताना पत्रकारांचे सहाय्य घेतले जाईल असे सांगितले. महाविद्यालयाबद्धल उपप्राचार्य प्रा. आर. एम. आंबेकर यांनी माहिती दिली. यावेळी पत्रकार राजू देवळेकर, जाकीर शेख, संदिप कोतकर, विकास काजळे, राहुल सुराणा, विकास शेंडगे, गणेश घाटकर, सुमीत बोधक, मंगेश शिंदे, समाधान कडवे, किरण रायकर, भागिरथ आतकरी, राम शिंदे, शांताराम भांगे, शहाबाज शेख यांचा परिचय करून त्यांना महाविद्यालयातर्फे सन्मानित करण्यात आले. सर्व पत्रकारांतर्फे नूतन प्राचार्य डाॅ. किरण रकिबे यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्तविक प्रा. आर. डी. शिंदे यांनी तर आभार प्रा. एस. बी. फाकटकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी नॅक समन्वक प्रा. एस. एस. परदेशी, प्रा. के. के. चौरसिया. प्रा. अरूण वाघ यांनी सहकार्य केले.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group