टाके घोटी ग्रामपंचायतीच्या दोन जागा बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज –  टाके घोटी ग्रामपंचायतीच्या प्रभाग एक मधील दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. पंचवीस वर्षाची परंपरा कायम ठेवत वार्ड एक मध्ये दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाने, माजी सरपंच नंदू भटाटे, नारायण नाठे, मदन लहाने, अनिल तोकडे, दशरथ भटाटे, रवींद्र भटाटे, रमेश मानवढे, गोरख दुभाषे, केशव लहाने, राजाराम लहाने, उत्तम […]

इगतपुरी तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर १७ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक घोषित : ५ नोव्हेंबरला मतदान आणि ६ नोव्हेंबरला होणार मतमोजणी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देण्यासह आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत परिणामकारक ठरणाऱ्या १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसह १७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. १६ ते २० ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ५ नोव्हेंबरला मतदान तर निकाल ६ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी ऑनलाईन तर पोटनिवडणूकीसाठी पारंपरिक […]

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणी कार्यक्रम सुरु : मतदार नोंदणी करण्यासाठी तहसीलदार अभिजित बारवकर यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – निवडणूक आयोगाने नाशिक विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार याद्या बनविण्याचे काम सुरू झाले असून ३० सप्टेंबरला जाहीर सूचना प्रसिद्ध होईल. १५ व २५ ऑक्टोबरला याद्यांची वर्तमानपत्रात पुनरप्रसिद्धी केली जाईल. दावे व हरकती स्वीकारण्यासाठी २३ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर असा आहे. निकाली काढण्याचा अंतिम दिनांक २५ डिसेंबर […]

इगतपुरी तालुक्यात “स्वराज्य पक्ष” ठरणार सक्षम पर्याय : तालुकाध्यक्ष नारायण भोसले, युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे यांचा विश्वास

इगतपुरीनामा न्यूज – राजकारणाचा घोडेबाजार, बंडखोऱ्या सामान्य जनता पाहत असून लोक अधिकच संभ्रमात आहे. सदेवजन राजकारणाकडे गलिच्छ नजरेने बघत आहे. एकमेव पारदर्शक स्वच्छ व इतिहासाची जोड असलेला जनतेचा पारदर्शक पक्ष सध्यातरी स्वराज्य हाच आहे. त्यामुळे जनता पुन्हा स्वराज्य उदयास आणणार आहे. तरुण आता संघटित झाला असून जाणकार लोकांसह इतर संघटनांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र वाचविण्याची गरज […]

गोरख बोडके यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी जिल्हाध्यक्ष पदावर निवड : सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्षपद इगतपुरी तालुक्याला लाभले दुसऱ्यांदा : – उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी दिले नियुक्तीपत्र

इगतपुरीनामा न्यूज – उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, कॅबिनेट मंत्री ना. छगनराव भुजबळ यांनी माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाशिकचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष म्हणून सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडील. या माध्यमातून मी सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी कार्य करण्यावर भर देणार आहे. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीकडून सोपवलेली जबाबदारी जनकल्याण आणि पक्षबांधणीसाठी उपयोगी ठरेल असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन कार्यकारी जिल्हाध्यक्ष […]

आगामी लोकसभेसाठी ॲड. संदीप गुळवे यांनी उमेदवारी करावी : इगतपुरी तालुका इंदिरा काँग्रेसची मतदार संपर्क अभियान आढावा बैठक संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी काळात गट तट विसरून सर्वांनी एकत्र जोरात काम करावे, आगामी लोकसभेसाठी ॲड. संदीप गुळवे यांनी उमेदवारी करावी. पुढचा आमदार काँग्रेसचाच निवडून येईल विश्वास इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी विश्वास व्यक्त केला. इगतपुरी तालुका काँग्रेसची मतदार संपर्क अभियान आढावा बैठक रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली […]

तहसीलदार अभिजित बारवकर यांचे राजकीय पक्षांच्या तालुकाध्यक्षांना मार्गदर्शन : मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या पार्श्वभुमीवर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांना माहिती देण्यासाठी बैठक संपन्न झाली. यावेळी इगतपुरी तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष हजर होते. बैठकीमध्ये तहसीलदार अभिजीत बारवकर […]

२१ जुलै  ते २१ ऑगस्ट दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी देणार भेट : मतदारांसह नागरिकांनी सहकार्य करण्याचे तहसीलदारांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुषंगाने इगतपुरी ( अ ज ) विधानसभा मतदार संघ अंतर्गत १५५ मतदार केंद्रावर २१ जुलै ते २१ ऑगस्ट दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( ब्लॉक ) घरोघरी भेट देणार आहेत. यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून १ […]

कऱ्होळेच्या उपसरपंचपदी चंद्रभागा राजाराम खातळे यांची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कऱ्होळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंद्रभागा राजाराम खातळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी सरपंच पांडुरंग खातळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आले. अध्यासी अधिकारी म्हणून लोकनियुक्त सरपंच श्रावण पांडुरंग आघाण यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ रामचंद्र आघाण, निलम रतन भवर, आशा पंढरीनाथ आघाण उपस्थित होते. निवडीची […]

राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही, मतदार यादी अधिसूचनेमुळे सोशल मीडियात फिरतेय चुकीची बातमी!

इगतपुरीनामा न्यूज : राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै २०२३ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणूक वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्न […]

error: Content is protected !!