
इगतपुरीनामा न्यूज – पिंपळगाव मोर विविध कार्यकारी सोसायटीवर पंढरीनाथ काळे यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ परिवर्तन पॅनलने १२ पैकी ८ जागांवर विजय मिळवून परिवर्तन घडवून आणले. प्रतिस्पर्धी शेतकरी विकास पॅनलला अवघ्या ४ जागांवर मिळाल्या. २०२२ ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च मुदतीत सादर न केल्याने संचालक मंडळ अपात्र झाले होते. त्यामुळे सर्व रिक्त जागांवर निवडणूक घेण्यात आली. सर्वसाधारण गटातून पंढरीनाथ झुंगा काळे, धनराज मुरलीधर बेंडकोळी, फत्तु रामचंद्र बेंडकोळी, रामनाथ रघुनाथ बेंडकोळी, रघुनाथ पांडुरंग कदम, अशोक विठ्ठल काळे, हौशीराम मुकुंदा काळे, रामदास विठोबा काळे हे ८ जण विजयी झाले. शेतकरी विकास पॅनलचे रामदास संतू काळे, बाळू धोंडू मेंगाळ, पार्वताबाई बहिरू जाखेरे, यशोदा दामू पिंगळे हे ४ जण विजयी झाले.