
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील भरवज निरपण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर सौ. मोहिनी काळू नाडेकर यांची नुकतीच निवड झाली आहे. माजी सरपंच प्रकाश भले यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली. लोकनियुक्त सरपंच सौ. जाईबाई तुकाराम भले यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सौ. मोहिनी काळू नाडेकर यांची उपसरपंचपदी वर्णी लागल्यानंतर समर्थक आणि ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. दुर्गम आदिवासी क्षेत्रातील भरवज निरपण गावाच्या उपसरपंचपदी झालेली माझी निवड म्हणजे गावाच्या विकासासाठी माझ्यावरील जबाबदारी असल्याचे मी समजते. त्यानुसार मी माझ्या कार्यकाळात ही जबाबदारी समर्थपणे पार पाडील. सरपंच सौ. जाईबाई तुकाराम भले यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करेल अशी प्रतिक्रिया नव्या उपासरपंच सौ. मोहिनी नाडेकर यांनी दिली. निवडीच्या बैठकीवेळी ग्रामपंचायत सदस्य अजय भले, कल्पना भले, माजी उपसरपंच शारदा साळवे, विठ्ठल घारे, सामाजिक कार्यकर्ते आकाश भले, अशोक भले, माजी सरपंच श्रावण मेमाणे, पोलीस पाटील अर्चना घारे हजर होते. निवडीची घोषणा झाल्यानंतर अंकुश भले, कचरू भले, दत्तू भले, बाजीराव नाडेकर, वाळू भले, लहू भले, आनंद साळवे, प्रतीक साळवे, स्वप्नील साळवे, अंकुश बुळे, लक्ष्मण मेमाणे, तुकाराम बगाड, तुकारामबाबा घारे, मारुती तिटकारे, केशव भले, माजी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ भले, दत्तू नाडेकर, मारुती लोटे, मयूर तिटकारे, बचतगटाच्या प्रमुख सौ. कमल श्रावण मेमाणे, आदींनी जल्लोष केला. यावेळी घोटी पोलीस स्टेशनचे कर्मचारी इंगळे, साळवे सर यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.