इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठी 7 डिसेंबर पर्यंत अंतिम मतदार यादी तयार केली जाणार आहे. 23 डिसेंबरला जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून निवडणुकीची घोषणा करण्यात येणार आहे. त्यानुसार 29 जानेवारी 2023 ला मतदान आणि 30 जानेवारीला मतमोजणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १ घोटी खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या स्विकृत संचालकपदी रामेश्वर दत्तू खुळगे, गणेश माधव फोकणे तर कायदेशीर सल्लागारपदी संतोष भिकाजी फोकणे यांची निवड करण्यात आली. निवडीची घोषणा होताच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. घोटी खुर्द येथील सोसायटी इगतपुरी तालुक्यात अग्रेसर असून ह्या संस्थेकडे तालुक्याचे नेहमीच लक्ष लागून असते. यावेळी सोसायटीचे चेअरमन चंद्रभान विष्णू […]
लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरी तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यांत शिक्षणाची दारणामाई ज्यांच्यामुळे वाहत आहे असे इगतपुरी तालुक्याचे अग्रणी शिक्षणमहर्षी लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे यांचे वारसदार ॲड. संदीप गोपाळराव गुळवे यांचा मविप्र संचालकपदाच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी ऐतिहासिक विजय झाला. अनेक संकटे, दबा धरून बसलेले विरोधक, अनेक कारस्थाने आदींच्या नाकावर टिच्चून ॲड. संदीप […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ मराठा विद्या प्रसारक समाज ह्या अग्रगण्य शिक्षण संस्थेची निवडणूक सुरु आहे. ह्या निवडणुकीत इगतपुरी तालुक्यातील उच्चशिक्षित, कायदेतज्ज्ञ आणि सभासदांमध्ये दांडगा लोकसंपर्क असणारे ॲड. दिनकर संतुजी खातळे हे उमेदवारी करीत आहेत. निवडणुकीच्या रिंगणातील दोन्ही पॅनलचे त्यांच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष लागले आहे. शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी, ग्रामीण भागातील समस्यांची जाण, दोन दशके इगतपुरी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी आणि इतर मागास प्रवर्गासाठी राजकीय आरक्षणाची सोय संविधानात केलेली आहे. ह्यानुसार वेळोवेळी आरक्षण काढून सर्वांना समान न्याय देण्याचे तत्व पाळले जाते. असे असले तरी आदिवासी आणि मागास वर्गाला मिळालेल्या राजकीय आरक्षणामुळे प्रस्थापितांची राज्यसत्ता मात्र चांगलीच धोक्यात येते. अन त्या आरक्षणाचा गळा दाबण्यासाठी हालचाली सुरु होतात. अशा ज्वलंत […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद गटांची संख्या पूर्वीप्रमाणे करण्याबाबत अध्यादेश प्रसिद्ध झाला. मात्र ह्या निर्णयामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कमीतकमी 5 महिने लांबणीवर जाऊन पडल्या आहेत. नव्याने निर्माण केलेल्या गट आणि गणात तयारी करून बसलेल्या अनेक उमेदवारांना यामुळे चांगलाच फटका बसला आहे. आतापर्यंत केलेला खर्च वाया गेला […]
इगतपुरीनामा न्युज दि. ५ इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाचा सौ. सविता मनोहर काजळे यांनी महिना भरापूर्वी राजीनामा दिला होता. आवर्तन पध्दतीने नवीन उपसरपंच पदाची प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रीयेत उपसरपंच पदासाठी ललिता रवी काजळे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी किरण शेलवणे यांनी सौ. ललिता काजळे यांची उपसरपंचपदी निवड जाहीर केली. यावेळी सरपंच […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ इगतपुरी नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ८ ( अ ) मधून निवडून आलेल्या शिवसेना नगरसेविका सीमा प्रल्हाद जाधव यांना नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांनी अनर्ह अर्थात अपात्र ठरवले आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आला आहे. आदिवासी सेनेचे संस्थापक दि. ना. उघाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या निवडणुक विवादानुसार हा आदेश […]
इच्छुक उमेदवारांचे धाबे दणानले ; काहींना फुटले धुमारे इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ राज्यातील शिंदे सरकारने राज्यातील जिल्हा परिषदांची गटरचना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याचसोबत वाढलेले गट कमी करून पूर्वीच्या जुन्या गटांची रचना कायम करण्यात येणार आहे. परिणामी मागील आठवड्यात काढलेले आरक्षण मातीमोल ठरणार आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने आरक्षण काढण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागेल. अनेक […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा, न्यूज, दि. ३ महत्वाचे : ह्या बातमीची कॉपी करून अन्य माध्यमात प्रसिद्ध केल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मागील आठवड्यात आरक्षण काढण्यात आले. ह्यामुळे कुठे धुमारे अन कुठे फवारे असे वातावरण जिल्हाभर निर्माण झाले. विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुद्धा सुरु करून जनसंपर्क वाढवला. आरक्षणामुळे अनेक बड्या […]