घोटी खुर्द सोसायटीच्या स्विकृत संचालकपदी रामेश्वर खुळगे, गणेश फोकणे तर कायदेशीर सल्लागारपदी संतोष फोकणे यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

घोटी खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या स्विकृत संचालकपदी रामेश्वर दत्तू खुळगे, गणेश माधव फोकणे तर कायदेशीर सल्लागारपदी संतोष भिकाजी फोकणे यांची निवड करण्यात आली. निवडीची घोषणा होताच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. घोटी खुर्द येथील सोसायटी इगतपुरी तालुक्यात अग्रेसर असून ह्या संस्थेकडे तालुक्याचे नेहमीच लक्ष लागून असते.

यावेळी सोसायटीचे चेअरमन चंद्रभान विष्णू फोकणे, व्हॉइस चेअरमन शिवाजी सिताराम मोंढे, संचालक आत्माराम फोकणे, द्रोपदाबाई खातळे, लालू बिन्नर, बळवंत रोंगटे, कचरू फोकणे, विमलबाई कोकणे, शिवाजी फोकणे, माजी चेअरमन बाळासाहेब खातळे, पोलीस पाटील कैलास फोकणे, माजी चेअरमन रूंजा  फोकणे, तानाजी फोकणे, संतोष फोकणे विष्णू सखाराम फोकणे, सुभाष फोकणे, उपसरपंच कैलास फोकणे, बाळासाहेब कलवर, दशरथ फोकणे, जगन कोकणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!