इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
मराठा विद्या प्रसारक समाज ह्या अग्रगण्य शिक्षण संस्थेची निवडणूक सुरु आहे. ह्या निवडणुकीत इगतपुरी तालुक्यातील उच्चशिक्षित, कायदेतज्ज्ञ आणि सभासदांमध्ये दांडगा लोकसंपर्क असणारे ॲड. दिनकर संतुजी खातळे हे उमेदवारी करीत आहेत. निवडणुकीच्या रिंगणातील दोन्ही पॅनलचे त्यांच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष लागले आहे. शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी, ग्रामीण भागातील समस्यांची जाण, दोन दशके इगतपुरी तालुक्यात वकील म्हणून नामवंत कार्य ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे. लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे यांचे खंदे समर्थक तथा कऱ्होळे येथील तत्कालीन पोलीस पाटील स्व. संतू भाऊ खातळे हे प्रसिद्ध व्यक्तिमत्व त्यांचे वडील आहेत. उच्चशिक्षित वकील, सक्षम उमेदवार आणि सभासदांशी स्नेहबंध अशी त्रिसूत्री लाभलेले ॲड. दिनकर संतुजी खातळे यांच्या उमेदवारीने प्रस्थापितांचे धाबे दणानले आहे. त्यांची उमेदवारीची जागा निश्चित होण्यासाठी चढाओढ असली तरी त्यामध्ये ते बाजी मारतील असा विश्वास अनेक सभासदांनी व्यक्त केला आहे.
इगतपुरी तालुक्यातील अतिशय ग्रामीण आणि आदिवासी भागातील ॲड. दिनकर संतुजी खातळे हे मराठा विद्या प्रसारक समाज ह्या संस्थेचे सभासद आहेत. घोटी येथील मविप्र संचलित जनता विद्यालय आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयात शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. वकील संघांचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी यापूर्वी चांगली कामगिरी केलेली आहे. प्रसिद्ध वकील म्हणून ते इगतपुरी न्यायालयात गेल्या २० वर्षांपासून दिवाणी व फौजदारी प्रकरणे चालवत आहेत. इगतपुरी तालुक्यातील सुप्रसिद्ध वकील ॲड. बाळासाहेब वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिली व्यवसायात पदार्पण केले. त्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी ॲड. दिनकर खातळे सक्रिय असतात. उच्चशिक्षित तरुण वकील आणि सभासदांमध्ये त्यांची चांगलीच लोकप्रियता असून त्यांनी 10 ऑगस्टला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. सह्याद्री बंगला, संभाजीनगर घोटी येथे त्यांचे कार्यालय असून सभासदांच्या अडचणी सोडवण्यासाठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. इगतपुरी तालुक्यातील सभासदांकडून ॲड. दिनकर खातळे यांना मविप्रच्या संचालकपदावर निवडून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे.
"बहुजन हिताय बहुजन सुखाय" या ब्रीदवाक्याचा आदर करून बहुजन समाजाची उन्नती व्हावी, त्यासाठी समाज आणि समाजाचे महान कर्मयोगी यांचे जाज्वल्य विचार घेऊन मी मविप्र निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माझे शैक्षणिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात चांगले योगदान आहे. त्यामुळे समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो यासाठी मी उमेदवारी अर्ज केला आहे. समाजामध्ये माझा दांडगा जनसंपर्क असून वकिली व्यवसायाच्या माध्यमातून समाजाची सेवा करीत आहे. निवडणुकीच्या माध्यमातून सभासद बंधू भगिनी मला सेवा करण्याची निश्चितच संधी देतील.
- ॲड. दिनकर संतू खातळे, मविप्र उमेदवार