
इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी आणि इतर मागास प्रवर्गासाठी राजकीय आरक्षणाची सोय संविधानात केलेली आहे. ह्यानुसार वेळोवेळी आरक्षण काढून सर्वांना समान न्याय देण्याचे तत्व पाळले जाते. असे असले तरी आदिवासी आणि मागास वर्गाला मिळालेल्या राजकीय आरक्षणामुळे प्रस्थापितांची राज्यसत्ता मात्र चांगलीच धोक्यात येते. अन त्या आरक्षणाचा गळा दाबण्यासाठी हालचाली सुरु होतात. अशा ज्वलंत विषयाला सणसणीत वाचा फोडण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील युवकांनी “किवटी” ह्या लघु चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रत्येक आदिवासी आणि जागरूक नागरिकांनी हा लघुपट आवर्जून पाहावा अशी कथा यामध्ये समाविष्ट केलेली आहे. कथेचे लेखन निलेश तुळशीराम भोपे यांनी केले आहे. लघुपटातील रेडीओ बातम्यांसाठी पत्रकार भास्कर सोनवणे यांचा आवाज देण्यात आला आहे.
जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर आज हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. इगतपुरीनामाचे संपादक भास्कर सोनवणे यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आगरी सेनेचे नेते अनिल भोपे, खादी ग्रामोद्योगचे संचालक भगीरथ भगत, चंद्रकांत म्हसणे, तुळशीराम म्हसणे आदी हजर होते. दिग्दर्शक धनराज म्हसणे यांनी ह्या लघुपटाची माहिती सर्वांना दिली. युट्यूबच्या https://youtube.com/c/DhanrajMhasane या चॅनेलवर हा लघुपट पाहता येणार आहे. प्रेक्षकांनी हा लघुपट पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करावे. कॉमेंट, लाईक जरूर द्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे. राजकारणातील आदिवासींच्या आरक्षणाची खरी परिस्थिती दाखवणारा हा लघुपट https://youtu.be/eYefWWFPVks ह्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल.
"किवटी" लघुपटाचे किमयागार
दिग्दर्शक : धनराज गणपत म्हसणे
लेखक : निलेश तुळशीराम भोपे
सिनेमाग्रोफर : प्रकाश भागडे, सुनील शिंदे, सुनील चव्हाण
संपादक : निगल स्टुडिओ
संगीत : विलास डावखर, डीजे भूषण स्टुडिओ इगतपुरी
मुख्य कलाकार : बाळा दुभाषे, मंगला बच्छाव, सुनील नागमोती, काजल म्हसणे, सौरभ भांगरे, सुदाम शिंदे
पोस्टर : अतिष निगल
सहनिर्माते : प्रशांत कडू, सचिन लंगडे
विशेष आभार : वैभव गगे, अनिल भोपे, ईश्वर चव्हाण, विनय खारे, दीपाली बेंडाळे, तुळशीराम म्हसणे, किशोर म्हसणे, कार्तिक म्हसणे, वासुदेव भागडे, रवि महाराज गुंजाळ, मंगेश भेगडे, गणेश मेमाणे.
