इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
इगतपुरी तालुक्यातील 5 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 13 ऑक्टोबरला होणार आहेत. अडसरे खुर्द, भरवज, आवळी दुमाला, कऱ्होळे, भावली बुद्रुक ह्या 5 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुका घोषित झाल्या आहेत. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. थेट सरपंच पदासाठी मतदान करायचे असल्याने मतदार राजाचा कौल ग्रामविकासाला थेट हातभार लावण्यास मदत करणार आहे. गावपुढाऱ्यांना सत्ता व गावच्या सरपंचपदी विराजमान होण्यासाठी प्रत्येक घरचा उंबरठा झिजवावा लागणार आहे. निवडणूक कार्यक्रमची प्रसिद्धी तहसीलदार १३ सप्टेंबर रोजी करणार असून नामनिर्देशन पत्र भरण्याचा कालावधी २१ ते २७ सप्टेंबरपर्यंत आहे. प्राप्त अर्जांची छाननी २८ सप्टेंबरला होऊन ३० सप्टेंबरला माघार व लगेच चिन्ह वाटप होईल. १३ ऑक्टोबरला मतदान होणार असून १४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. संबंधित ग्रामपंचायत हद्धीत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.