मतदार यादी प्रमाणीकरण : इगतपुरी तालुक्याने ओलांडला ५० हजाराचा टप्पा

इगतपुरीनामा न्यूज, दि. 14

राज्यात सध्या मतदार यादीतील तपशील प्रमाणीकरण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामध्ये मतदार याद्या आधारकार्डशी संलग्न करण्यात येत असून मतदार यादीतील तपशील प्रमाणीकरण करण्यासाठी आधारकार्ड वरील नोंदींची मदत घेतली जात असून मोठ्या प्रमाणावर मतदार याद्या आधार कार्डशी संलग्न केल्या जात आहेत. इगतपुरी तालुक्याने यात आघाडी घेतली असून नुकताच 50 हजाराचा टप्पा पार झाला आहे. उर्वरित आधार संकलन पूर्ण करण्यासाठी मतदारांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले आहे.

इगतपुरी (१२७, अनु. जमाती) मतदार संघामध्ये इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर अशा दोन तालुक्यांचा समावेश आहे. यापैकी इगतपुरी तालुक्यात सद्यस्थितीत १४३२५९ मतदार असून आता पर्यंतच्या नोंदणी नुसार इगतपुरी तालुक्यामध्ये पन्नास हजारांपेक्षा जास्त मतदारांचे आधार संकलन पूर्ण झाले आहे. पण संख्येचा विचार करता जवळपास 35 टक्के काम पूर्ण झाले असून नागरिकांच्या सहकार्याने लवकरच 100% काम पूर्ण होईल असा विश्वास तहसीलदार कासुळे यांनी व्यक्त केला. इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण हे यासाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम करत असून सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून तहसीलदार परमेश्वर कासुळे हे काम पाहत आहेत, तर इगतपुरी नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज गोसावी, भूमी अभिलेख उपअधीक्षक विष्णू भाबड, गटविकास अधिकारी अमित भुसावरे हे अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

मतदार नोंदणीच्या तपशील आधार कार्ड सोबत लिंक करणे ही प्रक्रिया अतिशय सोपी असून वोटर हेल्पलाइन ॲपच्या मदतीने कोणीही ती सहज करू शकतो. ज्यांना ही प्रक्रिया स्वतः करणे शक्य नाही ते आपल्या बीएलओकडे नमुना क्रमांक सहा ब भरून देऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. आतापर्यंत पन्नास हजारांपेक्षा जास्त मतदारांचे आधार संकलन झाले असून लवकरच इगतपुरी तालुक्यातून शंभर टक्के संकलनाचे उद्दिष्ट साध्य होईल असा विश्वास आहे.
- परमेश्वर कासुळे, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, इगतपुरी

तालुक्यामध्ये १५५ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) कार्यरत असून १५५ मतदार यादी भाग आहेत. बीएलओंच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येत असून 14 पर्यवेक्षकांच्या नियंत्रणाखाली हे कामकाज सुरू आहे. मतदारांकडून नमुना नंबर ६ ब भरून त्यानंतर Garuda ॲप वर तपशील भरून घेतला जात आहे. मतदार स्वतः सुद्धा वोटर हेल्पलाइन ॲपवर आपला आधार तपशील भरून प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. चे प्रमाणिकरण अद्याप बाकी आहे अशा सर्व मतदारांनी तत्काळ बीएलओ यांच्याकडे नमुना क्रमांक ६ भरून द्यावा अथवा स्वतः वोटर हेल्पलाइन ॲपवर आपला आधार तपशील भरून या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसीलदार परमेश्वर कासुळे, निवडणूक नायब तहसीलदार एस. एम. कारंडे, लिपिक श्री डोंगरे, डेटा ऑपरेटर बाजीराव कोकणे आदींसह निवडणूक शाखा इगतपुरी यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!