विठ्ठल लंगडे यांच्या नेतृत्वाखाली कांचनगाव सोसायटीची निवडणुक बिनविरोध : संपूर्ण १३ जागांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ संपुर्ण इगतपुरी तालुक्यात होत असलेल्या अनेक विविध कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणुकांमध्ये अतिसंवेदनशील जमजली जाणारी कांचनगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आहे. शिवसेनेचे गटनेते तथा इगतपुरी पंचायत समितीचे सभापती विठ्ठल लंगडे यांच्या नेतृत्वाखाली ह्या सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे. संपूर्ण १३ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. सर्वसाधारण आदिवासी कर्जदार खातेदार गटातून संतु […]

गोंदे दुमाला सोसायटी निवडणुकीत सहकार विकास पॅनेलच्या २ जागा बिनविरोध : उर्वरित १० जागांसाठी होणार निवडणूक

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ इगतपुरी तालुक्यातील महत्वाच्या असणाऱ्या गोंदे दुमाला विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सहकार विकास पॅनलने विजयी सलामी दिली आहे. पॅनलच्या चंद्रकला राजाराम नाठे, गंगुबाई भीमा नाठे या दोघी महिला बिनविरोध निवडून आल्या आहेत. इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी चेअरमन विजय नाठे, माजी सरपंच गणपत जाधव, माजी उपसभापती हरिश्चंद्र नाठे यांच्या मार्गदर्शनाखाली […]

गिरणारे सोसायटीवर दिलीप थेटे यांच्या “आपला पॅनलचा” दणदणीत विजय : निवृत्ती घुले यांच्या “शेतकरी पॅनलचा” सुपडा साफ

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ नाशिक तालुक्यातील अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील असणाऱ्या गिरणारे विविध कार्यकारी संस्थेच्या निवडणुकीत दिलीप शंकरराव थेटे यांच्या नेतृत्वाखाली आपला पॅनलने शेतकरी पॅनलला चांगलीच धूळ चारली आहे. आपला पॅनेलने १३ पैकी १२ जागा जिंकून निर्विवाद यश मिळवले आहे. विरोधी शेतकरी पॅनलचे प्रमुख निवृत्ती घुले यांच्या भावाच्या पराभवाने शेतकरी पॅनलला आपला पॅनलने अस्मान दाखवले. […]

महत्वपूर्ण असणाऱ्या आंबोली सोसायटीची निवडणूक बिनविरोध

ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ त्र्यंबकेश्वर तालुक्यात आंबोली विविध विकास कार्यकारी सोसायटी महत्वाची समजली जाते. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या ह्या सोसायटीची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली असून याबाबत विशेष समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जेष्ठ नेते विद्यमान संचालक ॲड. कैलास पाटील, शिवसेना नेते मनोहर मेढे पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अरुण मेढे, शिवसेना […]

मानवेढे आदिवासी सोसायटीची निवडणूक बिनविरोध : ज्ञानेश्वर भागडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली निवडणूक

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ मानवेढे आदिवासी विविध काय॔कारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मानवेढेचे माजी सरपंच ज्ञानेश्वर सोनु भागडे, जामुंडेचे माजी सरपंच भावडु आगिवले यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक बिनविरोध झाली. चेअरमन पदी कमळुपाटील दरोडे तर व्हॉइस चेअरमनपदी ज्ञानेश्वर सोनू भागडे यांची वर्णी लागली आहे. सोसायटीचे बिनविरोध संचालक म्हणून माजी सरपंच भावडु आगिवले, तात्यापाटील भागडे, माजी […]

गोरख बोडके गटाचे आडवण सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व : ८ संचालक बिनविरोध करून सत्ता स्थापनेकडे शेतकरी विकास पॅनलची घोडदौड

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागात अत्यंत प्रतिष्ठेच्या असणाऱ्या आडवण आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने ८ जागा बिनविरोध मिळवल्या आहेत. जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या गटाने ह्या ८ जागा बिनविरोध ताब्यात घेतल्या. ह्या सोसायटीवर चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन पद मिळवून सत्ता स्थापन […]

गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली मोडाळे सोसायटी निवडणूक बिनविरोध : १३ पैकी संपूर्ण १३ जागांवर गोरख बोडके यांचे वर्चस्व

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. १३ पैकी संपूर्ण १३ जागांवर गोरख बोडके यांनी संचालक बिनविरोध निवडून आणले. सामान्य शेतकरी आणि […]

मायदरा आदिवासी संस्थेच्या चेअरमनपदी आनंदा घोरपडे : व्हॉइस चेअरमनपदी दत्तू केवारे यांची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ मायदरा, टाकेद खुर्द, धानोशी, ठोकळवाडी या गावांच्या एकत्रित असलेली मायदरा आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी आहे. ह्या संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, श्रीपत पाटील लगड, यशवंत केवारे यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व १३ जागा निवडून आलेल्या होत्या. आज घेण्यात आलेल्या चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदावर आनंदा ढवळू घोरपडे व […]

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी युवा नेते हरिश्चंद्र चव्हाण यांची नियुक्ती : पालकमंत्री भुजबळ, युवक जिल्हाध्यक्ष कडलग यांनी दिले नियुक्तीपत्र

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी युवा नेते हरिश्चंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील ग्रामपंचायतीचे ते माजी सरपंच असून त्यांची कारकीर्द तालुक्यात आदर्श मानली जाते.राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री ना. छगनराव भुजबळ, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. इगतपुरी तालुक्यातील सर्व गावांत […]

राष्ट्रवादी पुन्हा ..! भाजप नगरसेविकेसह विविध राजकीय पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश : इगतपुरी तालुक्यात सध्या राष्ट्रवादीचा चांगलाच बोलबाला

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० इगतपुरी तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांत सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वरचष्मा वाढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यातील सर्व भागात भक्कम स्थान निर्माण केले आहे. इगतपुरी शहरातही पक्षाचे प्राबल्य चांगलेच वाढले आहे. ह्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री पालकमंत्री ना. छगनराव भुजबळ याच्या उपस्थितीत इगतपुरी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी […]

error: Content is protected !!