गोंदे दुमाला सोसायटीवर सहकार विकास पॅनलचा दणदणीत विजय : संपूर्ण १२ जागांवर विजय संपादन करून सत्ता स्थापन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २

इगतपुरी तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या असणाऱ्या गोंदे दुमाला विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सहकार विकास पॅनलने दणदणीत विजय संपादन केला आहे. सोसायटीच्या निवडणुकीसाठी मतदारांनी भरभरून मतांचे दान सहकार विकास पॅनलच्या पारड्यात टाकले. इगतपुरी तालुक्यात ह्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांचे विशेष लक्ष लागले होते. सहकार विकास पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच गणपत जाधव, माजी चेअरमन विजय बळवंतराव नाठे, राजाराम बाबुराव धोंगडे, हरिश्चंद्र बाबुराव नाठे, इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी केले. अनुभवसंपन्न आणि राजकारणाचा दीर्घ अनुभव असल्यामुळे गोंदे दुमाला सोसायटीची निवडणूक जिंकता आली. संपूर्ण १२ जागांवर हा विजय झाल्याने तालुक्यात अभिनंदन सुरू आहे.

आज झालेल्या मतमोजणीमध्ये विजय बळवंतराव नाठे, राजाराम बाबुराव धोंगडे, हरिश्चंद्र बाबुराव नाठे, इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, शांताराम जाधव, भगवान नाठे, विजय कचरू नाठे, संजय नाठे, नामदेव नाठे, कृष्णा सोनवणे, गंगुबाई नाठे, चंद्रकला नाठे यांचा विक्रमी मतांनी विजय झाल्याचे घोषित करण्यात आले. सोसायटीच्या मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून विकासासाठी जीवाचे रान करू असे उद्गार नवनिर्वाचित संचालक विजय बळवंतराव नाठे यांनी सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!