विठ्ठल लंगडे यांच्या नेतृत्वाखाली कांचनगाव सोसायटीची निवडणुक बिनविरोध : संपूर्ण १३ जागांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१

संपुर्ण इगतपुरी तालुक्यात होत असलेल्या अनेक विविध कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणुकांमध्ये अतिसंवेदनशील जमजली जाणारी कांचनगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आहे. शिवसेनेचे गटनेते तथा इगतपुरी पंचायत समितीचे सभापती विठ्ठल लंगडे यांच्या नेतृत्वाखाली ह्या सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे. संपूर्ण १३ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.

सर्वसाधारण आदिवासी कर्जदार खातेदार गटातून संतु रामा भगत, निवृत्ती भाऊ भगत, सखाराम काळु लाव्हरे, ज्ञानेश्वर दलु भगत, हरिश्चंद्र दलु भगत, कैलास दलु भगत, सर्वसाधारण बिगर आदिवासी कर्जदार गटातून भास्कर केरू गव्हाणे, विठोबा एकनाथ कडु, अनुसूचित जाती जमाती गटातुन शैलेंद्र बाळासाहेब चंद्रमोरे, आदिवासी महिला राखीव गटातून शितल शंकर भगत, ताईबाई सोनु भगत, इतर मागास प्रवर्ग गटातून प्रकाश त्र्यंबक गव्हाणे, भटक्या विमुक्त जाती गटातून देविदास विठ्ठल लंगडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून श्री. परदेशी यांनी काम पाहिले. यावेळी पंचायत समिती इगतपुरीचे सभापती विठ्ठल लंगडे, माजी उपसरपंच रामदास गव्हाणे, सतिष गव्हाणे, मच्छिंद्र कडु, लालु दुभाषे, नंदू माळी, नामदेव गव्हाणे, अंकुश कडु, पिंटु गोईकणे, राजाराम गव्हाणे, एकनाथ गव्हाणे, मुरलीधर दुभाषे, जनार्दन लंगडे आदींसह बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!