महत्वपूर्ण असणाऱ्या आंबोली सोसायटीची निवडणूक बिनविरोध

ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

त्र्यंबकेश्वर तालुक्यात आंबोली विविध विकास कार्यकारी सोसायटी महत्वाची समजली जाते. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या ह्या सोसायटीची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली असून याबाबत विशेष समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जेष्ठ नेते विद्यमान संचालक ॲड. कैलास पाटील, शिवसेना नेते मनोहर मेढे पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अरुण मेढे, शिवसेना तालुका समन्वयक समाधान बोडकेपाटील शिवसेना  तालुका उपप्रमुख संजय मेढेपाटील, ॲड. भास्कर मेढे, ॲड. शरद मेढे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर मेढेपाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष प्रयत्न करून आंबोली विविध विकास कार्यकारी सोसायटी निवडणूक बिनविरोध पार पाडण्यात आली,

ॲड. कैलास पाटील, चंद्रकला मनोहर मेढेपाटील, सुमन दिनकर मेढेपाटील, अंबादास मेढेपाटील, सुनील मेढेपाटील, दत्तात्रय एकनाथ जाधव, रामू गजीराम मेढे, किसन सीताराम मेढे, राजाराम विठोबा मेढेपाटील, भावडू लुखा बोडकेपाटील, ॲड. कृष्णा बोडकेपाटील, चैतू बुधा लचके यांची संचालकपदी बिनाविरोध निवड करण्यात झाली. लवकरच संस्थेचे पदाधिकारी निवडण्यात येणार असल्याचे, सोसायटीचे सचिव रामदास महाले यांनी माहिती दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!