
इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
मानवेढे आदिवासी विविध काय॔कारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मानवेढेचे माजी सरपंच ज्ञानेश्वर सोनु भागडे, जामुंडेचे माजी सरपंच भावडु आगिवले यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक बिनविरोध झाली. चेअरमन पदी कमळुपाटील दरोडे तर व्हॉइस चेअरमनपदी ज्ञानेश्वर सोनू भागडे यांची वर्णी लागली आहे. सोसायटीचे बिनविरोध संचालक म्हणून माजी सरपंच भावडु आगिवले, तात्यापाटील भागडे, माजी सरपंच फुलचंद वीर, पोपटराव भागडे, सोनू डोके, सनु दरवडे, रामा दरवडे, सोमा दरवडे, जाईबाई माळी, लक्ष्मीबाई वीर यांची निवड झाली आहे. इगतपुरी तालुक्यात नवनियुक्त चेअरमन, व्हॉइस चेअरमन आणि संचालकांचे अभिनंदन सुरू आहे.