गोरख बोडके गटाचे आडवण सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व : ८ संचालक बिनविरोध करून सत्ता स्थापनेकडे शेतकरी विकास पॅनलची घोडदौड

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८

इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागात अत्यंत प्रतिष्ठेच्या असणाऱ्या आडवण आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने ८ जागा बिनविरोध मिळवल्या आहेत. जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या गटाने ह्या ८ जागा बिनविरोध ताब्यात घेतल्या. ह्या सोसायटीवर चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन पद मिळवून सत्ता स्थापन करण्यासाठी गोरख बोडके यांच्या गटाने आघाडी घेतली आहे. उर्वरित ४ जागांसाठी निवडणूक की बिनविरोध हे लवकरच समजणार आहे.

बंडू दगडू शिद, रामदास पांडुरंग रेरे, सखाराम सोमा रेरे, यशवंत गणपत आघाण, कमळू रामजी आघाण, गणपत हरी आघाण, यशोदाबाई सीताराम भले, हौसाबाई भागा आघाण हे ८ संचालक बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी मिलींद परदेशी यांनी केली. गोटीराम शेलार व माजी सरपंच आनंदा डाके यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने ह्या निवडणुकीत चांगले यश संपादन केले आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, गोटीराम शेलार, माजी सरपंच आनंदा डाके, हरिश्चंद्र चव्हाण, भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष दतु कापसे, कारभारी शेलार, माजी सरपंच कैलास भगत, सुरेश डोळस, संपत कोकणे, सुनील डोळस यांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!