इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
इगतपुरी तालुक्यातील महत्वाच्या असणाऱ्या गोंदे दुमाला विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सहकार विकास पॅनलने विजयी सलामी दिली आहे. पॅनलच्या चंद्रकला राजाराम नाठे, गंगुबाई भीमा नाठे या दोघी महिला बिनविरोध निवडून आल्या आहेत. इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी चेअरमन विजय नाठे, माजी सरपंच गणपत जाधव, माजी उपसभापती हरिश्चंद्र नाठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार विकास पॅनल उभा करण्यात आला आहे.
गोंदे दुमाला विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या १२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यापैकी सहकार विकास पॅनलच्या चंद्रकला राजाराम नाठे, गंगुबाई भीमा नाठे या दोघी महिला उमेदवार आज बिनविरोध निवडून आल्या आहेत. आता १० जागांसाठी निवडणूक होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी चेअरमन विजय नाठे, माजी सरपंच गणपत जाधव, माजी उपसभापती हरिश्चंद्र नाठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार विकास पॅनलचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.बिनविरोध निवडणून आलेल्या महिलांचे परिसरात अभिनंदन सुरू आहे.