गिरणारे सोसायटीवर दिलीप थेटे यांच्या “आपला पॅनलचा” दणदणीत विजय : निवृत्ती घुले यांच्या “शेतकरी पॅनलचा” सुपडा साफ

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७

नाशिक तालुक्यातील अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील असणाऱ्या गिरणारे विविध कार्यकारी संस्थेच्या निवडणुकीत दिलीप शंकरराव थेटे यांच्या नेतृत्वाखाली आपला पॅनलने शेतकरी पॅनलला चांगलीच धूळ चारली आहे. आपला पॅनेलने १३ पैकी १२ जागा जिंकून निर्विवाद यश मिळवले आहे. विरोधी शेतकरी पॅनलचे प्रमुख निवृत्ती घुले यांच्या भावाच्या पराभवाने शेतकरी पॅनलला आपला पॅनलने अस्मान दाखवले. विरोधी पॅनलने आपला पॅनलच्या पराभवासाठी विविध प्रकारच्या व्युव्हरचना करूनही सभासदांनी त्यांना तोंडघशी पाडले. आगामी गिरणारे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ह्या निवडणुकीला विशेष महत्व आले होते. ह्या पार्श्वभूमीवर आपला पॅनलने १२ जागांवर मिळवलेला विजय म्हणजे आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद गटावरील विजय समजला जात आहे.

अत्यंत अटीतटीच्या असणाऱ्या नाशिक तालुक्यातील सर्वात मोठ्या गिरणारे सोसायटीच्या निवडणुकीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आगामी काळात होणाऱ्या गिरणारे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ह्या निवडणुकीकडे पाहिले जात होते. तुलनेने दुबळ्या पण विजयाचा फोल दावा करणाऱ्या विरोधकांनी माजी सभापती दिलीप शंकरराव थेटे यांच्या विरोधात जंग जंग पछाडले. परंतु त्यांचा मितभाषी स्वभाव आणि लोकाच्या मनात असलेली सहानूभुती यापुढे विरोधकांना नामोहरम व्हावे लागले. बहुसंख्य सभासदांनी शेतकरी पॅनलच्या उमेदवारांना नाकारून आपला पॅनलच्या उनेदवारांच्या पदरात मतदान केले. विरोधी शेतकरी पॅनेलचे पॅनलप्रमुख निवृत्ती घुले यांच्या भावाचा पराभव नाशिक तालुक्यात चर्चिला जात आहे.

दिलीप थेटे यांना भिकाभाऊ थेटे, माधव बाबा थेटे, राजाराम भिमा थेटे, पांडु बाविस्कर, वाकचौरे सर, दीपक पिंगळे, गोकुळ दत्तात्रय थेटे, रमेश थेटे, ज्ञानदेव थेटे, दगुनाना थेटे, भाऊसाहेब संतु थेटे, भावराज नामदेव थेटे, कचरूपाटील तांबेरे, संतोष पंढरीनाथ थेटे, सुनील बंडू थेटे, विष्णू गोपाळ थेटे, अशोक त्र्यंबक थेटे, नागलवाडी ग्रामस्थ, साडगाव ग्रामस्थ, गिरणारे ग्रामस्थ यांनी मौलिक साथ दिली. यामुळे शेतकरी पॅनलचा धुव्वा उडवण्यात आपला पॅनेलला यश आले.
चुरशीच्या निवडणुकीत आपला पॅनलचे दिलीप शंकरराव थेटे, भिमाजी यशवंत थेटे, नामदेव पंढरीनाथ गायकर, बापूराव भिकाजी थेटे, भाऊसाहेब यशवंत थेटे, नंदू पोपट थेटे, राजाराम शिवाजी तांबेरे, अशोक पुंजा भोर, सुनील कचरू मोरे, भाऊसाहेब बाळकृष्ण लिलके, सुमनबाई साहेबराव थेटे, सुनंदा सुदाम थेटे ह्या १२ जणांनी शेतकरी पॅनलचा पराभव करून विजय संपादन केला.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!