इगतपुरी रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्महत्येच्या तयारीत असलेल्या युवकाचा वाचला प्राण

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळाजवळ आत्महत्या करण्याच्या तयारीत असणाऱ्या एका युवकाला लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पोलिसांमुळे नवजीवन मिळाले आहे. रेल्वे पोलिसांनी काही क्षण दक्षता घेतली नसती तर हा युवक येणाऱ्या रेल्वे गाडीखाली आपले जीवन संपवणार होता. पोलीस अंमलदार राजेंद्र बोराळे, हवालदार योगेश साळेकर, रेल्वे सुरक्षा बल उपनिरीक्षक श्री. मिना, जीवन राठोड यांच्यामुळे ह्या […]

दारिद्र्याशी संघर्ष करणाऱ्या युवकाच्या मोटारसायकल चोरीची सत्यकथा : चोरट्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्या पोलिसांच्या कार्याला सलाम

इगतपुरीनामा न्यूज – अठरा विश्व दारिद्र्याशी झुंजतांना थोड्याफार शिक्षणाच्या आणि जिद्धीच्या बळावर कुटुंबाला पुढे नेण्यासाठी एक नवतरुण युवक अंबड एमआयडीसी मधील एका कंपनीत काम करतो. इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम भागातून कंपनीपर्यंत जवळपास ७० किमीचे मोठे अंतर आहे. घरापासून कंपनीपर्यंत मिळेल त्या वाहनाने कुटुंबाला पुढे नेण्यासाठी तो प्रयत्न करीत होता. काही महिन्याच्या पगारातील बचतीचे पैसे आणि आईकडील […]

मोटरसायकल चोरी करणारे ४ आरोपी ग्रामीण एलसीबीच्या जाळ्यात : इगतपुरी तालुक्यासह अन्य भागातील ९ गुन्हे उघडकीस ; २० मोटारसायकली जप्त

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या पथकाने जिल्ह्यातील अतिदुर्गम भागांमध्ये मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेवुन कारवाई केली आहे. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे […]

भाऊबंदकीच्या वादातून चुलत भावाचा केला खून ; इगतपुरीजवळची घटना

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथे भाऊबंदकीच्या वादातुन ५० वर्षीय व्यक्तीचा खून झाला आहे. आज सकाळी दहा वाजेच्या सुमाराला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर धारदार शस्त्राच्या वाराने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. खून झालेला व्यक्ती संशयित आरोपीचा सक्खा चुलत भाऊ असल्याचे कळते आहे. जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्याआधीच संबंधिताचा मृत्यू झाला. मदन बबन गोईकणे वय […]

नासिक मुंबई महामार्गावर खड्डेच खड्डे ; वाहतूक व्यवस्था कोलमडली : ९ ऑगस्टपर्यंत सुधारणा न केल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे यांचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज – नासिक मुंबई महामार्ग ह्या प्रमुख रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. खड्डेच खड्डे पडले असल्याने ह्या रस्ता कसा म्हणावा असा प्रश्न पडतो आहे. कुठे खड्डे चुकविताना तर कुठे खड्यांमधून रस्ते शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्डेमय रस्त्यांवरून जीव धोक्यात घालून […]

भावलीजवळ नियंत्रण सुटल्याने २ वाहने छोट्या पुलाखाली कोसळली :  समोरच्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात झाला अपघात

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या दोन वाहनांचा अपघात झाला आहे. समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवायच्या प्रयत्नात भगतवाडी गावाजवळ हा अपघात झाला आहे. वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही वाहने रस्त्यालगत असणाऱ्या छोट्या पुलावरून खाली कोसळले. ह्या वाहनांमधील ४ जण जखमी झाले असून त्यांची नावे अद्याप कळाली नाहीत. इगतपुरी पोलिसांना याबाबत माहिती […]

ट्रेलरची सात आठ वाहनांना धडक ; १३ जण जखमी : कसारा घाटातील घटना

इगतपुरीनामा न्यूज – नवीन कसारा घाटामध्ये धबधबा पॉईंटच्या ठिकाणी हायवे लगत सहा सात वाहने थांबलेली असताना मुंबईच्या दिशेने मोठ्या लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रेलरचा ब्रेक फेल झाला. त्यातच घाटात धुके असल्याने वाहनाचा अंदाज न आल्याने थांबलेल्या सहा ते सात वाहनांना धडक दिली आहे. यात जवळपास तीन ते चार जण गंभीर  जखमी झाले आहेत तर सात […]

निवडणुकीतील मारहाण प्रकरणी युवासेना उपजिल्हाप्रमुख मिथुन राऊत यांच्यासह ६ जण निर्दोष

इगतपुरीनामा न्युज – २००८ मध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गट युवासेना उपजिल्हाप्रमुख मिथुन राऊत यांच्यावर आणि त्यांचे सहकारी पेठ पंचायत समितीचे माजी सभापती अंबादास चौरे, आमलोण ग्रामपंचायत माजी सरपंच प्रकाश बोरसे, घनशेतचे माजी सरपंच कैलास चौधरी, हरसुलचे माजी सरपंच अशोक लांघे, मुरंबीचे माजी सरपंच अर्जुन मौळे, गावठाचे माजी सरपंच हिरामण […]

भारतीय न्याय संहिता, नागरी सुरक्षा संहिता आणि साक्ष अधिनियम कायद्यांची अंमलबजावणी सुरु – एसडीपीओ बाबुराव दडस : घोटी पोलीस ठाण्यात नव्या कायद्याबद्धल नागरिकांना बैठकीत मार्गदर्शन 

इगतपुरीनामा न्यूज – ब्रिटिशकालीन भारतीय दंड विधान, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा १ जुलैपासून इतिहासजमा झाला आहे. त्याऐवजी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम २०२३ हे कायदे लागू झाले आहे. नागरिकांना सुरक्षित ठेवून कायदा सुव्यवस्था जपण्यासाठी नव्या कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन नाशिक ग्रामीणचे उपविभागीय पोलीस […]

माणिकखांब येथे अज्ञात समाजकंटकांनी जाळल्या ४ मोटारसायकली : ३ मोटारसायकली भस्मसात ; १ अंशत: जळाली

इगतपुरीनामा न्यूज – माणिकखांब, ता. इगतपुरी येथे रात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांकडून ४ मोटारसायकली जाळल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. दाट लोकवस्तीमधील घरांच्या समोर उभ्या असणाऱ्या ह्या मोटारसायकली जाळण्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सुरेश चव्हाण, हरिभाऊ चव्हाण, अनिल भटाटे, राजू भटाटे यांच्या मोटारसायकली जाळण्यात आल्या आहेत. या चार […]

error: Content is protected !!