इगतपुरीनामा न्युज – २००८ मध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गट युवासेना उपजिल्हाप्रमुख मिथुन राऊत यांच्यावर आणि त्यांचे सहकारी पेठ पंचायत समितीचे माजी सभापती अंबादास चौरे, आमलोण ग्रामपंचायत माजी सरपंच प्रकाश बोरसे, घनशेतचे माजी सरपंच कैलास चौधरी, हरसुलचे माजी सरपंच अशोक लांघे, मुरंबीचे माजी सरपंच अर्जुन मौळे, गावठाचे माजी सरपंच हिरामण मोरे यांच्यावर हरसुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डाॅ. जे. व्ही.पालीवाल यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. त्यानुसार आज निकाल घोषित करण्यात आला. त्यानुसार तब्बल १६ वर्षांनी ७ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सोळा वर्षापुर्वी गुन्हा दाखल केल्यानंतर अनेक वर्षांपासून हा खटला न्यायालयात सुरु होता. या गुन्ह्यात जिल्हा न्यायाधीशांसमोर खटल्यातील तक्रारादाराची साक्ष व पंचाचे साक्षी पुरावे तपासण्यात आले. या गुन्ह्यात शिंदे गट युवासेना उपजिल्हाप्रमुख मिथुन राऊत यांच्यासह ६ जणांची आज बुधवारी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या सर्वांतर्फे ॲड. संदिप पवार यांनी कामकाज पाहिले.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group